Skip to main content

माझी शायरी

लेखक एस.योगी यांनी गुरुवार, 29/10/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
आजवर वेळोवेळी काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय. काही लेखन प्रासंगिक आहे. काही ठरवून झाले आहे. तर काही सुचेल तसे मांडलेले आहे. मिसळपाव च्या अथांग सागरात हे अर्घ्यदान करीत आहे. आपलाच एस.योगी. ------------------------------------------------------------------- मेहफूझ पाता हू खुद को अंधेरो में उजाला कही मेरा गम उजागर न कर दे .. ----------------------------------------- टूटते हुए वादे देखकर जीते रहे जिंदगीभर और वोह है की हर रोज इक नया वादा करते रहे.. ----------------------------------------- अश्क की जात है गिरना और इन्सान की गिराना.. ----------------------------------------- दर्द तो मज तब दे
काव्यरस

बॅकपॅकिंग आणि कॅम्पिंग साहित्याची ओळख

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 29/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
कॅम्पिंग हा प्रकार वेगळ्या नावाने आपण भारतात करतच असतो. असे ट्रेक्स जेव्हा आपण दिवसभर वणवण करून कोण्या एका गडावर जातो ,तिथल्या मंदिरात किंवा गुहेत पथारी पसरतो. भोवतालचे तीन दगड एकत्र करून सोबत नेलेल्या सामानातून काही बाही शिजवून खातो आणि सोबत आणलेल्या पांघरुणात मस्त ताणून देतो. थोड्याफार फरकाने या अश्याच प्रकाराला बाहेरच्या देशांमधे हायकिंगआणि कॅम्पिंग म्हणतात. पुण्यात राहत असताना सह्याद्रीमध्ये एक दोन दिवसचे मुक्कामी नाईट ट्रेक भरपूर केले . तेव्हा हायकिंग आणि कॅम्पिंगसाठी कश्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात ह्याची फारच जुजबी माहिती होती.

एक पहाट गावाकडची ………

लेखक एकप्रवासी यांनी बुधवार, 28/10/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
चमकून गेली वीज, भिजवून गेल्या सरी माळरानांनी पांघरली हिरवी शाल अंगावरी पक्षांची किलबिल कोकिळेची शीळ, निसर्गाच संगीत लई भारी उडती पक्षी एकामागून एक, आभाळी जशी पंढरीची वारी सारं गाव जाग करी भूपाळीन, वासुदेवाची स्वारी मधुर स्वरांना साथ चिपळीची, घेऊन चालली दारोदारी बुजगावण्याच्या भेटीला चालला शेतात शेतकरी वाऱ्यासंगे झुले किती तांदूळ अन बाजरी घंटानाद आला कानी, पोहचला देवपूजेला पुजारी भगवा झेंडा फडकत आहे राउळाच्या कळसावरी लाल रंग वाढला समोर पूर्वेच्या क्षितीजावरी दिसे एका अंगणात कोणी सूर्याला अर्घ्य करी

झोंबाड

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 28/10/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला. शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं. "आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो.

आमचीही एक 'स्वारीची तयारी'… चंद्रावर!!

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 28/10/2015 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
. . (या लेखातल्या नावाशी किंवा घटनेशी तुमचं कोणतंही साधर्म्य असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे ढिशक्लेमर उपचारापुरतंच… त्यातूनही काही तुमच्या जवळपास जाणारं सापडलं, तर तुम्हाला देवच तारो अशी सदिच्छा!!) मुंबईत एकवेळ देव सापडेल, पण मनासारखं घर सापडणं महाकठीण!! रोजच्या वृत्तपत्रातल्या घरासंदर्भातल्या पानपानभर चकचकीत जाहिराती पाहून कोणालाही भुरळ न पडली तरच नवल बरं का….

C is for Community (may be not for Competition)

लेखक मी अपर्णा यांनी बुधवार, 28/10/2015 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
. . शनिवारची सकाळ. सहा वाजल्यापासून मुलं येऊन सरावाला लागलेली असतात. कदाचित त्यांनी आधी स्पीड स्केट्स घालून सराव केला असेल आणि आम्ही नवाच्या invited only क्लाससाठी पोहोचेपर्यंत त्यांचे इन्डोअर स्केट्स घालायला सुरुवात झाली असेल. आम्हीदेखील पटापटा मुलांच्या पायातले शूज बदलून त्यांना स्केट्स घालायला सुरू करतो.

पॉन सॅक्रिफाईस

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 28/10/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
. . रॉबर्ट जेम्स फिशर.. तोच तो बॉबी फिशर! बुद्धिबळाची थोडीशीदेखील आवड असलेल्या प्रत्येकाला माहीत असलेले नाव.

चिमुकल्या कविता...

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 28/10/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतला सर्वात छोटा, परिचित आणि सर्वाधिक लोकप्रिय काव्यप्रकार म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी तर एक संपूर्ण पिढी नादावली होती. ते काव्य अर्थात आवडलं होतं. पण त्याहून वेगळ्या काही कविताही आवडल्या आहेत. प्रविण दवणे यांची बोन्साय ही अशीच एक कविता. म्हटलं तर आवडली, म्हटलं तर अजिबात आवडली नाही.

अनवहाणी चालणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 28/10/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतात ते दिवस. "गै वयनी,कालचां काय शिळांपाक्यां असलां तर वाढ गे!" माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या अंगणाच्या बाहेरून दगडूमहाराचा( दगडूमहार ह्याच नांवाने तो ओळखला जात असल्याने तसं नाईलाजाने म्हणावं लागतं.) हा आवाज ऐकल्यावर माझी आजी मांगरात जाऊन अंगावरचं लुगडं सोडून मांगरातून जूनं लुगडं-त्याला कोकणात बोंदार म्हणायचे-नेसून यायची.ते झाल्यानंतरच दगडूमहाराच्या करटीत-नारळ फोडून नारळातलं खोबरं काढून झाल्यावर उरलेले कडक आवरणाचे दोन भाग.त्यातल्या अर्ध्या भागाला करटी म्हणायचे-आम्ही लहान मुलांनी खाऊन झाल्यावर उरलेली पेज आणि फणसाची भाजी,त्याच्या करटीत वरून टाकायची .करटीत टाकलेली पेज पिऊन झाल्यावर फ

काउंट डाउन...

लेखक आनंद कांबीकर यांनी बुधवार, 28/10/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आपण क्षणा क्षणाला बदलत असतो. आपल्या गरजा बदलत असतात. आपण त्या वाढवत असतो. खाली यावं लागल याचा विचार हि न करता वरचढ़ होत असतो. वेळेसोबत आपली सहनशीलता कमी होते. वाढत असते ते परावलंबन आणि सीमा ओलांडून उपभोग घेण्याची सवय. सुरु असते उधळपट्टी, नासाड़ी. दहा जणांच्या गरजा भागवल असे एकटाच गिळु पाहतो. गिळतो. आणि मग निसर्ग ही थकतो, आपले लाड पुरवुन-पुरवून. त्याचा कल ढासळतो. तो बिथरतो. आपण ही बिथरतो पण आपण तुटतो. अगदी पार आतून बाहेरून तुटतो. आपल्या हाती काहीच नसते. त्याच्या बिथरण्यात सगळं चराचर नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. त्याच्या अशा बिथरण्याची सुरुवात म्हणजे अखिल मानव जातीचा 'काउंट डाउन' सुरु होतो.