Skip to main content

सुबोध भावे की कट्यार

लेखक सुज्ञ यांनी सोमवार, 16/11/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
जुनं ते सोनं ही म्हण आपल्याकडे फार जुनी आहे. पण जुन्यात बदल करून केलेलं काहीही असेल तरी ते सोनंच अशी नवी पद्धत काही लोक अस्तितवात आणू पाहत आहेत. . जुन्या लोकप्रिय कलाकृती निवडून त्यात आपल्याला हवे तसे बदल घडवून तेच सोनं असे म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे प्रकार म्हणूनच आजकाल सतत घडताना दिसतात. उदा. दुनियादारी हा चित्रपट . ते एक असो. आता आमच्या काळजा मधे “घुसवलेली” कट्यार पाहिल्यावर याचा पुनःप्रत्यय आम्हास आला. संगीत कट्यार काळजात घुसली हे दार्व्हेकारांचे व पंडित वसंत देशपांडे यांनी खांसाहेब या भूमिकेमुळे अजरामर केलेले , अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले नाटक.

साप्ताहीकी अर्थात ज(व्)ळून दुरदर्शन

लेखक नाखु यांनी सोमवार, 16/11/2015 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहीकी अर्थात ज(व्)ळून दुरदर्शन

निळ्या रंगातील साप्ताहीकी स्थानीक मिपा वाहीनीसाठी तर लाल रंगातील आम, खास आणि अर्थात मिपासहीत सर्वांसाठी

दिवस पहिला:

कलर मराठी वाहिनी तू माझा सांगाती वारे पाहून पक्ष्यांतर करण्यारा महाभागांचे भक्तीगीत कार्यक्रम सहभागी : गावीत कन्या, लक्ष्मण जगताप, ,राम कदम आणि तमाम किमान तीन चार पक्ष फिरलेले आजी माजी आमदार. कार्यक्रमाची सांगता हम होंगे कामयाब एक दिन या समूह गायनाने होईल.

स्पर्श.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 16/11/2015 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
“जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.” आज प्रो.देसाई बरेच उदास दिसले.माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी ताडलंय, की अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना तळ्यावर भेटतो तेव्हा ते बराच वेळ माझ्याशी बोलत नाहीत. आता इकडे शरद ऋतू चालू झाला आहे.झाडांची पानं रंगीबेरंगी व्ह्यायला लागली आहेत.प्रत्येक झाडांच्या पानांचा एक एक रंग पाहून निसर्गाच्या कुंचल्याची आणि त्याच्या रंग मिश्रणाच्या तबकडीची वाहवा करावी तेव्हडी थोडीच आहे असं वाटतं. लवकरच ही रंगीबेरंगी पानं,येणार्‍या वार्‍याच्या झुळकीबरोबर,देठापासून तु

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर...

लेखक मोदक यांनी सोमवार, 16/11/2015 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर.. आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली. ...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्‍याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या.

साळा भायरची साळा

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 15/11/2015 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
पाटलीन बाई आंत होत्या. बाहेर वट्यावर केराचं टोपलं मांडलेलं. त्याच्यात एक रंगीत, जुनाट, पानं उडालेलं पुस्तक पडलेलं. दाराची कडी वाजवून धोंडू तिथेच पुस्तक चाळत बसला. वरचे चित्र पाहुन खाली दिलेल्या अक्षरांची जुळवा जुळव करण्यात त्याचा बराच वेळ गेला. एका पानावरच्या बिल्डिंगीच्या चित्राखालचा 'ईमारत' हा शब्द त्याने जुळवत आणला तेवढ्यात दार उघडलं गेलं. "काय रे धोंड्या?" आणखी केर टोपल्यात टाकत पाटलीन बाईंन् विचारलं. " मायणं भगुलं दिलतं, रातच्याला आमी तोडिला निगन्हार हओ मनुन" धोंडू ते पुस्तक वापस केराच्या टोपल्यात खुपसत उभा राहिला आणि पातेलं बाईंच्या हातात दिलं. " चालले कारे?

विश्वास पानिपतच्या लढाईत नेहमीच जातो

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
"विश्वास पानिपताच्या लढाईत नेहमीच जातो" अलीकडं गोविंदा , आमचा अनेक दिवसाचा जूना ड्रायव्हर छान छौकी झाला होता. पूर्वी पांच पैशाला महाग असलेला गोविंदा सध्या कायम खिशात शे पाचशे बाळगून असायचा . रमी क्लब मध्ये त्याचं नशीब जोरावर आहे,तो सांगायचा . बरं आमच्या कंपनीत व्हावचर इ.लिखापढीला त्याच्या एव्हडं तत्पर कोण नसेल. तेल पाणी, इंधन , किरकोळ रिपेअरिंग, टोल ,ड्रायव्हरच्या अखत्यारीत असणार्‍या सर्व बाबी जिथल्यातिथं.संशयाला एव्हडीसुद्दा जागा नाही.

जराशी.............

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 15/11/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याच स्वप्नांत जागतो हा चंद्र आरास ह़ी चांदण्यांची मग सजते नभाशी हि रात्र अलगद मोहरुन येते जेव्हा तुझी चाहुल लागते जराशी...............| मदहोशल्या रात्री झुरते रातराणी नशा तव गंधाची तिला वाटे हविहविशी नाजुकशी अलवार मदमस्त हवा जेव्हा उठवित शहारे दरवळते जराशी............| फुलले रोमांच सर्वांगावरी या चुकतात ठोके या श्वासांच्या लयीशी रंगेल मिठीतल्या तुझ्या आवेगाला जेव्हा आठवून मनी मी लाजते जराशी..............| तु आलास दारी की हे तुझे प्रतिबिंब खेळे लपंडाव मन तुझ्या सावलीशी मिटल्या डोळ्यांतही तुझाच भास आहे जेव्हा कधी पापणी लवते जराशी...............| कधीतरी उत्तररात्री पाऊस पडुनी गे

दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/11/2015 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तुम्ही एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्‍छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, ‘मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत’, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनाची अवस्थाही तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला. मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच. त्याने उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत. बाप रे!

खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 15/11/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
ये तारा वो तारा हर तारा… देखो जिसे भी लगे प्यारा ये सब हो साथ मे, तो जगमगाया आसमां सारा! जगमग तारे, दो तारे, नौ तारे, सौ तारे, हर तारा ही शरारा… ये तारा वो तारा... अन्वयाला (माझी मुलगी) ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं... शहारे आले ऐकून आणि बघून ही! त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा!

२ कविता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
१...जाताना ऑफिस ला जाताना ऑफिस ला गडबड झाली. घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली . सिनेमासारखी सिच्युएशन झाली सुईत ओवत दोरा हि धावत आली . शिवताना गुंडी हि फार जवळ आली. मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली. तशीच तिला बाहुपाशात घेतली हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली अविनाश .............. २...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा.. बघताच खुदकन हसली . अन "खट्याळ काळजात घुसली"
काव्यरस