Skip to main content

बॉन्ड जेम्स बॉन्ड -'स्पेक्टर'

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 02/12/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल.

कलेजी

लेखक जागु यांनी बुधवार, 02/12/2015 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव किलो कलेजी २ मोठे कांदे चिरून ४-५ लसुण पाकळ्या ठेचून २ चमचे आल-लसुण पेस्ट अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल) पाव चमचा हिंग १ चमचा हळद २ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट १ चमचा गरम मसाला २ मोठे चमचे तेल थोडीशी कोथिंबीर चिरून चवीनुसार मिठ पाककृती : प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी.

नाखऱ्या

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 02/12/2015 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
नाखऱ्या आमच्यासाठी हिरो होता. होताच तो देखणा . गोरा, उंच, धारदार नाक, डोळे , कुरळे केस.. आणि आम्ही एकजात बावळट. आधी आपल्या थोबड्याबद्दल काय वाटायचं नाही पण सातवी आठवीपासून ते खूपच टोचायला लागलं . आपले केस भलतेच बारीक आहेत, तेल लावलं की एकदम चम्या दिसतो असे अनेक शोध लागू लागले. आणि या सर्व शोधांचा मापदंड होता नाखऱ्या. नाखऱ्या आमच्या जवळच राहत असे . त्याचे वडील बँकेत होते आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका. सुशिक्षित कुटुंब. आमच्या घरी सकाळच्या वेळी भाजीवाल्या येत असत. त्या आधी घरोघर जाऊन भाज्या विकीत आणि नंतर बाजारात विकायला बसत. पण त्या नाखऱ्याच्या घरासमोरून कधी जात नसत.

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/12/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरी . कधीही जा गडावर १००-१५० लोक सापडणारच .ठाणे,पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा गड म्हणजे माळशेज घाटाचा मुकुट मणीच म्हणायला हवा.हरिश्चंद्र गडावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत.

सोबत ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/12/2015 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"साssलाss ! ही रात्र नेहमी काळीच का असते बे?" वैतागलेल्या सुन्याने एकदाचे तोंड उघडले. "अबे पहाट गुलाबी असते ना, म्हणुन रात्र काळी..., हाकानाका!" पक्या खुसखुसला..... "गपे, उगाच फालतू जोक्स मारु नकोस. साला इथे बुडाला रग लागलीये बसुन बसुन. तुझा तो वाघ काही येत नाही पाणी प्यायला आज. आ़ज दिसायची शक्यता कमीच वाटतेय मला. बहुतेक निर्जळी अमावस्या दिसतेय त्याची." सुन्या करवादला. सुन्या उर्फ सुनील जगताप आणि पक्या उर्फ प्रकाश देशमाने...... दोन जिवलग मित्र! लहानपणापासुन एकत्र वाढलेले, शिकलेले. सुदैवाने नोकरीही एकाच शहरात आणि अजुन दोघेही बॅचलर्स. त्यामुळे प्रत्येक विकांताला कुठे ना कुठे भटकंती ठरलेली.

जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 02/12/2015 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
१९६५ चा सप्टेंबर महिना... लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती. प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर! सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती! विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला! सॉमरसेट विरुद्ध क्वार्टरफायनलमध्ये या दोघांपैकी एकाने २३ रन्स काढण्यासाठी तब्बल ३२ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या!

तमाशा

लेखक समीर_happy go lucky यांनी मंगळवार, 01/12/2015 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशा दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच. "काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजवण्यासाठी दिग्दर्शकाने पूर्ण कहाणी वाहून घेतलेली आहे.

अरे या ना रे

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 01/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
अरे या ना रे कि जीव गेला कि जग गेलं, झोपा रे अरे या ना रे की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे ना सांज ना सकाळ, सगळा अंधारच अंधार आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा ना अंधरुन ना रजाई ना उतरण ना चढाई आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे जळतच गेली जळत जळत गेली दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी नाही विझली नाही विझली हवेनेही नाही विझली ही जिंदगी एक फुंकर मारली सगळा धूर ऊडून गेला तो श्वास होता, एक ध्यास होता जो घेऊन गेला, सत्यानाश होता मायेच्या काळजाचा एक नाद होता अरे या ना रे ============================ सौजन्य:
काव्यरस

शाकाहार का मांसाहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/12/2015 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्‍ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्‍यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो.

एका प्रेमाची गोष्ट

लेखक विश्वव्यापी यांनी मंगळवार, 01/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा, झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा. आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला , परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.