सुटलेल्या पोटाची कहाणी -१
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन.
---------------
हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो.
मिसळपाव