Skip to main content

दूर तू दूर मी

लेखक माहीराज यांनी सोमवार, 07/12/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
दूर तू दूर मी का मनी हुर हूर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। का हे मन माझे तुझ्याशी बोलण्या आतुरले का फुलांशी खेळण्याला श्वास ही आसावले गीत आता तुच माझे ताल ही अन् सुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। जे अपुरे वाटते ते स्वप्न का रे रंगले का कळेना हे तुझे रे वेड मजला लागले जीवनाचा अर्थ तु जरी अंत ही अंकुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
काव्यरस

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???

लेखक ए ए वाघमारे यांनी सोमवार, 07/12/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ??? मध्यंतरी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नव्या संचातील पुनरूज्जीवित 'वाडा चिरेबंदी' बघण्याचा योग आला. हे नाटक मी याआधी वाचलेले होते. परंतु नाटक वाचणे वेगळे आणि प्रत्यक्ष सादरीकरण वेगळे. मागच्या वेळेस चंद्रकांत कुलकर्णींच्यांच दिग्दर्शनात या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमच्या पिढीला भारतीय रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड असलेले हे नाटक प्रत्यक्ष मंचावर पाहायला मिळेल अशी आशा नव्हती.

अपरिचित!

लेखक निनाव यांनी सोमवार, 07/12/2015 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व माझे ओळख कुणाची, नाव माझे दिले कुणी ? कुठला पत्ता सांगू मी गंतव्य माझे मलाच अनिश्चित ! कुणास ठाऊक कारण माझे कुणास ठाऊक स्वप्न सारे पहिले कुणी माझ्या साठी अपेक्षा पूर्ती कुणास कुणाची, असंख्य वेढे घेतले कुणी वडास त्या अपरिचित मी !
काव्यरस

बंडुमामाची बंडुमामी

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी सोमवार, 07/12/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
बंडुमामाची बंडुमामी जगावेगळ बोलायची भविष्यातल्या सोनेरी स्वप्नांची दारे अलगद खोलायाची लाळ गाळत हसताना नको तिथे दाबायची ! सावलीसारखा इल्या तसचं वागायचा भिरभिरणा-या भोव-यासारखा मागे मागे लागायचा पंखवाला स्वप्नातला घोडा हळूच जमीनीवर आणून सोडायचा ! बंडुमामाची सवयच निराळी चिलमीचा बार भारताच रंगायची स्वारी, घरामागच्या छपरात बंडुमामी कबुतरं उडवायची अन् बंडुमामाची गाडी रुळावरनं घसरायची ! कुणी अक्करमाश्या म्हटलं कि इल्या फिदीफिदी हसायचा तेवढ्यापुरता बंडुमामाचा चेहरा धुरात बुडायचा अन् बंडुमामी परसात जाताच जादूचा दरवाजा बंद व्हायचा ! चिलमीच्या धुरात बंडुमामा जळून गेला इल्या आता ओसरी

सुटलेल्या पोटाची कहाणी -३

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/12/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ __________________________________________________________________________________ निश्चय केला, मनातल्या मनात भीष्म की कायशीशी प्रतिज्ञा केली, 'पोट आत घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते आत घेणारच'. प्रतिज्ञा केल्यावर जाणवले बहुतेक हा हक्क नसून कर्तव्य असावे, पण मग शाळेत नागरिकशास्त्राच्या तासाला, 'हा मुलगा वर्गाचा नागरिक नसलेला बरा' असेच सर्व शिक्षकांचे मत असल्याने मी कायम outstanding विद्यार्थी राहिलो होतो, त्यामुळे अश्या चुका होणारंच अशी स्वतःची समजूत काढून घेतली.

भुजबळ व राज यांचे 'कृष्णकुंज'वर खलबतं..????

लेखक shawshanky यांनी सोमवार, 07/12/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. या महिन्यांत आठ जणांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपतेय.

हिवाळी अधिवेशन -मित्रपक्षांचीही नाराजी ? शेतकरी आत्महत्यांवर काय करणार?

लेखक अनिकेत एस जोशी यांनी सोमवार, 07/12/2015 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
नागपुरात सध्या हलक्या थंडीची सुरुवात झालेली आहे. सकाळच्या वळेत एखादा स्वेटर चालू शकेल इतपतच थंडी आहे. सोमवारपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे आणि त्यासाठी इथे दाखल होणाऱ्या मुंबईकरांना ही थंडी आल्हाददायक नाही वाटली तरच नवल. वातावरण पुढे अधिकाधिक थंड होणार आणि राजकारण मात्र गरमागरम होत जाणार असे नागपूरच्या अधिवेशनाचे वैशिष्ठ्यच आहे. तसेच यंदाही घडते आहे. गेली अनेक वर्षे प्रत्येक मुख्यमंत्र्यांना मनात कुठेतरी एका कोपऱ्यात नागपूरच्या अधिवेशनाची भीती वाटावी अशीच स्थिती राहिलेली आहे.

मला आवडलेला विनोद

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 06/12/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट. एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले. गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली. बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले. "अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते.

कोपरयातलं रोपट.

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 06/12/2015 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कॉलेजला नुकत्याच सुट्टया लागलेल्या होत्या. सगळं चंबुगबाळ घेऊन गावी निघालो होतो. पेपर संपल्यानंतरची खुशी काय वर्णवावी! रिझल्ट लागेपर्यंत का होईना ती टिकून राहते. बसस्थानकात अत्यंत स्वच्छ, मोकळी बस मझ्यासाठी उभी होती. 'प्रवासी हेच आमचे दैवत' हे सिद्ध करणारा तेजस्वी,हसरया चेह्रयाचा कंडक्टरही लाभला होता.कंदमुळे खाऊन या कंडक्टरने कोणालाही कंप सुटावा अशी तब्येत मिळवली असेल असे वाटले. अदबीने तिकीट फाडुन माझ्याकडे दिले गेले .नेहमीप्रमाणे अखिल भारतीयांना सतावणारा सुट्टया पैशांचा प्रश्न त्यालाही भेडसावत होता हे कळाले.