Skip to main content

दसरा की शिमगा

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 24/10/2023 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा की शिमगा? ते विचारांचे सोने की टोमणे व रोने काही दखल नेक? नुसती चिखलफेक जाळणार खोकेसूराची लंका अपात्रतेचा निर्णय कधी, शंका शिवाजी पार्क वि.आझाद मैदान कुठे पडणार पुढचं मतांच दान? मी काम करतो, जातो थेट साईटवर ते असतात लाईव्ह फेसबुक साईटवर गर्दी जमा ची रोजगार-हमी नाहीतर आहेच जंगली रमी मानसशास्त्र झूंडीचं मिडीया बाईट धूंडीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, शिंदे सरकार देणार म्हणजे देणार चिन्ह गेले, पक्ष गेला,आता कोर्टबाजी अपात्रतेचा निर्णय तो कधी येणार? जालना लाठीचार्जचा डायर कोण? षडयंत्राचा तो सुत्रधार कायर कोण? एकंदरीत होतोय समाज खुजा गल्लीत पोस्टर माझा कि तुझा. घरी जातांना काय टेक अ

प्रारब्ध भाग ३

लेखक साहना यांनी मंगळवार, 24/10/2023 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोविंदाने हळूहळू खटारा ओढत पूल सुद्धा पार केला. तो जुनाट लाकडी पूल इतका आवाज करत होता कि दोन्ही मुलांना भीती वाटली आणि त्यांनी आपल्या वडिलांना घट्ट पकडले. तो वाटसरू सुद्धा थोडा घाबरून चालत होता. पण एकदाचा पूल पार झाला. दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच पूल पहिला होता त्यामुळे त्यांना थोडी मजा सुद्धा वाटली. पुलाच्या दुसर्या बाजूचा रस्ता विस्तीर्ण होता. त्याला राजमार्ग असे संबोधायचे ह्या रस्त्यावर वर्दळ थोडी जास्त असे. आता उतरंड असल्याने सगळीच मंडळी खटार्यावर बसली होती आणि गोंविदाच्या पायांत थोडी गती आली होती. मार्गक्रमण करता करता दूरवरून थोडी धूळ दिसू लागली. हयग्रीव सावध झाला.

श्रीदुर्गानवरात्रीउत्सव - क्षत्रिय उपासना

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 23/10/2023 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व भाविकांना दुर्गा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र अगदी धामधुम चालु आहे. देवींचे मंडप, तिथली गर्दी, गरबा वगैरे नेहमीचाच गोंगाट. आपले भोडला , घागरी फुंकणे, गोंधळ वगैरे मराठी प्रकार काळाच्या ओघात हळुहळु विस्मरणात चालले आहेत. कालाय तस्मै नमः || मुळात खरेतर हा सण शक्तीउपासनेचा. शक्तीचा, बलाचा, ताकतीचा उत्सव. पण ते सारंच लोप पावत चालले आहे किंबहुना कधीच लोप पावले आहे. आता काय तर नऊ दिवस संगीबेरंगी कपडे घालुन मिरवणे अन पुरुषांन्नी फ्रॉक सदृष झ्यंकीप्यँकी कपडे घालुन उच्छृंखल गाण्यावर नाचणे असे काहीसे स्वरुप आले ह्या सणाला. अन त्यातही बोलायची काही सोय राहिली नाही.

'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग पहिला)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 21/10/2023 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: एकाच शिर्षकाचे हे दोन वेगवेगळे धागे - 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.' आणि 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी मोनी टीव्ही नावाच्या उपग्रह वाहिनीवरील 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या लोकप्रिय 'गेम शो' च्या निर्मात्यांनी ह्या कार्यक्रमाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने तयार करण्यात येणाऱ्या 'विशेष' भागासाठी विशेष अतिथी म्हणून ह्या गेम शो च्या दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात सहभागी झालेल्या धनंजय, शंतनू, सुधीर आणि परशुराम अशा चार स्पर्धकांना सहकुटुंब सह

मॉन्टी हॉल प्रॉब्लेम

लेखक भागो यांनी गुरुवार, 19/10/2023 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
मॉन्टी हॉल प्रॉब्लेम Marilyn vos Savant. 1946 मध्ये सेंट लुईस, मिसूरी येथे जन्मलेल्या या तरुणीला गणित आणि विज्ञानाची जन्मजात आवड होती. वयाच्या 10 व्या वर्षी, तिला दोन बुद्धिमत्ता चाचण्या देण्यात आल्या - स्टॅनफोर्ड-बिनेट आणि मेगा टेस्ट - या दोन्ही चाचण्यांनुसार तिची मानसिक क्षमता 23 वर्षांच्या युवा तरुणी इतकी होती. "जगातील सर्वोच्च बुद्ध्यांक" असल्या बद्दल तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली आणि परिणामी, तिला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. "जगातील सर्वात हुशार महिला" म्हणून तिचा दर्जा असूनही, वोस सावंत हिचा मात्र IQ चाचण्यावर विश्वास नाही.

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 18/10/2023 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं गाणं आपल्याला आवडतं, मग ते आपण वारंवार अगदी मन भरेपर्यंत सतत ऐकत राहतो. पण काही मोजक्या वेळेला असं होतं की, एखादं गाणं ऐकताना त्या संपूर्ण गाण्याऐवजी आपल्याला त्या गाण्याच्या अंतर्‍यात वाजलेला एखाद्या वाद्याचा (इन्स्ट्रूमेंटचा) पीस इतका आवडून जातो की, ती वेगळी धून ऐकण्यासाठीच फक्त आपण ते गाणं लूपवर ऐकायला लागतो. आत्ता पटकन अशी आठवणारी गाणी आपण पाहायला गेलो तर, त्यात सर्वात प्रथम, अलीकडच्या काळातलं 'मोह मोह के धागे' हे अनू मलिकने संगीत दिलेलं गाणं आणि त्याच्या अंतर्‍यात वाजलेली सनईची अफाट सुंदर ट्यून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते.

प्रारब्ध भाग २

लेखक साहना यांनी बुधवार, 18/10/2023 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचा भाग विंध्य पर्वतातील युद्ध संपले होते. नक्की राजा कोण ह्याची पर्वा आता कुणालाच नव्हती. सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्यात मग्न होता. हयग्रीवाचे घर कड्याकपाऱ्यांत असल्याने त्याला लोक कमीच भेटत. विंध्यकन्या नदीतून कधी कधी छोट्या नावा जात. हयग्रीवाने नदीच्या एका बाजूला लहानसा लाकडी धक्का बांधला होता. छोट्या नावा कधी कधी तिथे थांबत आणि हयग्रीव त्यांना अन्न पुरवी. दोन्ही मुले होईल तशी वडिलांची मदत करत. कुणी कधी जुने कपडे, इतर साधने देत. युद्ध संपले असले तरी असंख्य जनावरं युद्धाच्या झळीने जंगलांत पळाली होती.

मी अनुभवलेला भितीदायक प्रसंग!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 17/10/2023 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक अगदी वेगळा प्रसंग आहे. तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडत गेला. ह्या प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण ह्या प्रसंगाइतकं विचित्र आणि भयाण कधी धावलो व सैरावैरा चाललो नव्हतो! तर झालं असं होतं... मला अनेक दिवसांपासून जाणवत आहे की, माझा मित्र मला काही सांगू इच्छित आहे. आणि तो जे सांगू इच्छित आहे ते रहस्यमय आणि गोपनीय आहे. त्याबरोबरच त्या गोष्टीवर कशाचं तरी सावटसुद्धा आहे. नक्कीच काही तरी वेगळी गोष्ट असली पाहिजे. मी काही निमित्ताने औरंगाबादला आलो आहे.

भूक आणि तृप्ती : हॉर्मोन्सची जुगलबंदी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 16/10/2023 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी शरीरात स्रवणाऱ्या अनेक रसायनांमध्ये हॉर्मोन्सचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म प्रमाणात स्त्रवणारी हॉर्मोन्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणा एखाद्या चमत्काराप्रमाणे नियंत्रित करतात. आपल्या शरीरात जवळपास ६० हार्मोन्स विविध अवयवांत कार्यरत आहेत. त्यापैकी इन्सुलिन, थायरॉईड आणि ॲड्रीनल ग्रंथींच्या दमदार हार्मोन्सचा परिचय वाचकांना यापूर्वी करून दिलेला आहे. अन्न ही आपली मूलभूत गरज. भूक लागली की आपण खातो आणि खाता खाता तृप्तीची भावना झाली की खाणे थांबवतो. या दृष्टीने भूक आणि तृप्ती या दोन अतिशय महत्त्वाच्या संवेदना आहेत.

सृष्टी माया

लेखक Bhakti यांनी रविवार, 15/10/2023 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाजे लडिवाळ घुंगूरवाळा चरितसे गोजिरी कपिला | धरती गळा फुलांच्या माळा फुलपाखरांनी श्वास रंगला | वाहे धीरगंभीर निर्झर निळा नाद ,सृष्टी मंदिरा घुमला | स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा पाकळ्यांची बरसात रान सजला| अवचित पावा वाजला सावळा समाधी मनीची ,हरी हसला | -भक्ती