Skip to main content

वीट....(ती - त्याला)

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 29/12/2015 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा , वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा घेऊन जा , तुझी हरएक चिज़, घेऊन जा , दिलेल प्रेमाच बीज.... कस विसरू तुझ ,लाख वेळाच झूट, कितीदा न कशी देऊ पून्हा तीच ती सूट …। काळजाच्या माझ केलस तू तुकड , श्वासालाही माझ्या आत्ता हवेचे वाकड ….
काव्यरस

समता

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 29/12/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियेसी बरोबर गेलो मी तिच्या घरी , पोहोचण्या आधीच होती जातीची दरी 'जात काय ह्याची' - त्यांनी तिला विचारल दलित , सवर्ण - समतेच ज्ञान मी पाझरल [ ते ] अद्भुत तेवर विश्वास आहे आमचा , पण चमत्कार फक्त विसरायचा 'जात' नाही ती 'जात'असते पोरा 'वैरी ' नाही करायचा समाज सारा 'फळा'पुसला कि समानतेलाही इथं पुसतो , 'आंतरजातीय विवाह' सगळ्यांनाच इथं सलतो पण ,जे झालं ते आता 'चार भिंतीत' इथं विसरायचं , अन , आपण 'सगळे समान' असच बाहेर बोलायचं [मी ] ह्या 'सैतानाचा' आता कंटाळा आलाय , ह्या 'ठासण्याचा' आता कंटाळा आलाय ह्या 'व्यापाराचा' आता कंटाळा आलाय फक्त 'फायदाच 'काय त

माणूस

लेखक विश्वव्यापी यांनी मंगळवार, 29/12/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांच्या जातीत माणसं आहेत थोडीच ,उरलेली सर्व आहेत न उलाघाडणारी कोडीच माणसाने कसं माणसासारख वागावं , चोऱ्या मार्या कराव्यात आणि दुसऱ्याला नागवाव माणसांच्या वस्तीत माणूसच नसतो , चुकून जर भेटलाच तर आपणच टाळत असतो माणसाला नेहमीच अनंताची गोडी , मिळवण्यासारखे अनंत असतं पण वेळ असते थोडी एकटा असताना माणूस केविलवाणा होतो ,आणि माणसांच्या गर्दीत तो माणूस घाणा होतो . माणसाचे माणसाशी नातं तसं एकाच असतं ,एकमेकां वाचून त्यांचे काहीच चालत नसतं माणसाचे स्वताःच असं एक तत्वज्ञान असतं , बोलायचं एक नी करायचं दुसरंच असतं माणूस हा तसा खूप विचारी असतो , अविचार करतांना ही तो विचार करतोच माणूस हा अल्पसमा

काकणे आणि गाळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 29/12/2015 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखभरल्या वाटेवर पाऊल जपून टाक अनाहूत पडलेल्या उल्केचा खडा पायात शिरेल अन् तुझ्या अस्फुट हुंदक्याने संभोगनिद्रेतले गाव जागे होईल. कासाराच्या उकिरंड्यातल्या फुटक्या काकणांची पोरींनी तोरणे केलीत वा-याच्या झुळकीला चुकवून पुढे हो वारा वळला तर काकणे किनकिनतील अन् मन मारणा-या विधवांना शृंगारस्वप्ने पडतील. लुगडे जरा वर उचल लाजेचे भय तुला आहे अंधारास नाही चुकुन पाय अडकेल अन् धुळीचे लोट उठुन वखवखलेल्या कुत्र्याना जागे करतील तेव्हा मात्र अंधारपण लाजेल. नदीत पाय रेट उचलून टाकु नकोस खळखळाटात सोनेरी माश्यांबरोबर मनुष्य मांसाला चटावलेल्या सुसरीही उठतील मग मात्र गाव सोडणे अवघड होईल. वेशीतल्या गावदे

संपादक मंडळ

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 29/12/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे. आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. १) डॉ.

‪‎मी उत्सवला जातो‬ (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 29/12/2015 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ____________________________________________________________________________________ खाण्याच्या स्टॉल्सच्या ठिकाणी सगळीकडे फिरत आधी काय काय आहे त्याची चाचपणी केली. वेगवेगळे स्टॉल छान सजले होते. कुठे महाराष्ट्रीयन, कुठे चायनीज, कुठे राजस्थानी, कुठे मालवणी, कुठे पाव भाजी, कुठे दाबेली, कुठे चाट, तर कुठे काय अशी सगळी चंगळ होती. मी डाएट वर असल्याचे माझ्या ध्यानात होतं. म्हणून पहिला मोर्चा फळांच्या स्टॉलकडे वळवला. एक मोठा बाउल भरून फळांचे काप घेतले आणि ते खाण्यासाठी दिलेले लाकडी दातकोरणे फेकून सरळ हाताने खाऊ लागलो. कुणाला टोचून बोलणे मला अजून जमत नाही मग टोचून खाणे काय जमणार. म्हणून पाचही बोटांनी फळांना गुदगुल्या करत मोठ्या मजेने रसास्वाद घेऊ लागलो.

१५०

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 28/12/2015 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर. त्या दिवशी असाच आवाज आला 'धडाम... खळ्ळळ्ळ' . हा तसा बऱ्यापैकी मोठा आवाज.

गिल्बर्ट टेकडी गावदेवी दुर्गादेवि मंदीर अंधेरी पश्चिम.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 28/12/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
करड्या रन्गाच्या जटा आणि सफेद दाढी सोडुन गुगलेमहाराज शन्ख वाजवित्त बसले होते. त्यान्च्या त्या भयानक डोळ्यांकडे पाहुन मी म्हणालो महाराज किती बकाल झाली आहे ही मुम्बई? जिकडे तिकडे टोलेजन्ग इमारती, अतिक्रमणे , रहदारीतील अमाप वाढ आणि घाण. ह्या मुम्बईत समुद्र सोडुन काही प्राचीन आहे का? माझ्या या बोलण्याकडे पाहात गुगले बाबा भेसुर हासले आणि म्हणाले अजाण बालका,.......या मुम्बईत अशि एक टेकडी आहे जी कित्येक दशलक्ष वर्षान्पासुन उभी आहे. किती अतिक्रमणे , आणि काय काय पाहिले असेल या टेकडीने! गिल्बर्ट टेकडी! हा हा हा हा हा हा हा हा ! एकदा जाउन पाहाच.

अचारी पनीर/पनीर अचारी

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 28/12/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
achari 1 थांबा! थांबा!! थांबा!!! पनीर आणि पर्यायाने माझ्यावर कमेंट करण्याआधी ह्या पाकॄचे व्हेरीएशन्स पहा. ह्यात पनीर एवजी बटाटा, सीमला मिरची, बटाटा - सीमला मिरची, तोंडली (उभ्या चीरुन), भेंडी, फ्लॉवर, गाजर, आलू-गोभी, मटार किंवा मिक्स व्हेज ई. विविध भाज्या सींगल किंवा काँम्बो करुन घालता येतील. जेवढे म्हणून पर्याय सुचतील तेव्हढ्या विविध अचारी फ्लेवर भाज्या करता येतील... नॉनव्हेज वाल्यांनाही नाराज व्हायचं काम नाय.