शेवटची ट्रेन
शेवटची ट्रेन
शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला...
मिसळपाव
.