जिथे सागरा धरणी मिळते
मावळतीच्या सूर्याकडे पाहत पाहत पावले पडत होती. ओहोटी असल्याने चालायला भरपूर वाव होता. जसजसा पुढे जात होतो, तसतशी मागच्या लाऊडस्पिकर वर चालू असलेली क्रिकेट मॅचची कॉमेंटरी क्षीण होत होती. त्या तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. चालता चालता त्या पाण्यातील सूर्याच्या प्रखर प्रतिबिंबावर नजर रोखली गेली. आकाशातला सूर्य जणू जाता जाता वाळूवर रेंगाळत होता.
मिसळपाव