प्रारब्ध - ४
हयग्रीव ला जाग आली तेंव्हा कदाचित अंधार होता किंवा त्याच्या डोळ्यांना काळोख दिसत असावा. पण नाही, आकाशांत चांदणे दिसत होते. सर्वांग ठणकत होते. कुठेतरी बाजूला आग असावी कारण त्यातून उडालेल्या ठिणग्या हवेतून जात होत्या. तो जमिनीवर पडला असावा. इतक्यांत त्याला एक चेहेरा दिसला. नाही, त्याची छकुली नव्हती, पोरगा नव्हता. कुणीतरी दुसराच. काळे कपडे घातलेला थोडासा उग्र. हयग्रीव ने उठायचा प्रयत्न कला पण त्याला जमले नाही.
आधी त्याला वाटले कि मेलो असावो आणि नरकांत असू पण अचानक त्याची छकुली पळत आली आणि तिचा चेहेरा समोर येताच त्याला समजले कि हा नरक असणे शक्यच नाही. त्याचा मुलगा सुद्धा जवळ आला.
मिसळपाव