मोदीभक्त आम्ही...
मोदीभक्त आम्ही
रात्रंदिन जपतो
नमो नमः ।।धृ।।
तुमचे दौरे तुमच्या भेटी
तुम्ही जोडलेली जगभरची नाती
शिंझो अबे तुमचा मित्र
बराक तुमचा जणू शाळूसोबती
फेसबुक अन गूगलवाले
जीव भारी त्यांचा तुमच्यावरती
मिडियाच कशाला इथला
जग सारे गुणगान गाते पहा ।।१।।
परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता आता पूर
कारखान्यांमधून पुन्हा
निघू लागला सोन्याच्या धूर
साऱ्या देशाचा आता
बदलत चालला पुरता नूर
झाली सुखाची परमावधी
अच्छे दिन आले आम्हास अहा!
काव्यरस
( प्रतिसाद संकलन )
(प्रेरणा : http://www.misalpav.com/node/34982 )
प्रतिसादांचा सिक्सर हा कुठल्याही काथ्याकुटात चर्चेत कवितेवर थोडक्यात सर्वत्रच असायलाच हवा असा भाग. कुठे धागा काढायचा अवकाश, की तिथे जाऊन आलेल्यांच्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद सुरू होतात, "ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ", "चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन" वगैरे. शिवाय " अच्चा अचं जालं तलं" असे प्रतिसाद सुद्धा.
एक कविता : भाषेची
- डॉ. सुधीर रा. देवरे
डॉ. गणेश देवी स्थापित ‘भाषा संशोधन केंद्रा’शी त्याच्या स्थापनेपासून म्हणजे 1997 पासून मी जोडला गेलो, तेव्हापासून माझे नेहमीच बडोद्याला जाणे होत राहते. मध्यंतरी अहिराणी ‘ढोल’च्या संपादनामुळे बडोद्याला जाणे नित्याचेच झाले होते. माझी मातृभाषा अहिराणी, शैक्षणिक भाषा मराठी, आणि प्रसंगी कामचलाऊ असे हिंदी, इंग्रजीचे ज्ञान. या व्यतिरिक्तच्या बाकी भाषा म्हणजे मला ‘काळे अक्षर म्हैस बराबर’ अशा अगम्य.
‘ढोल’च्या एका अंकाच्या फायनल प्रुफ रीडिंगसाठी बडोद्याला गेलो असताना,
कॉम्प्युटरशेजारी बसून स्क्रिनवर महिला ऑपरेटरकडून मी दुरुस्त्या करून घेत होतो.
हे अशक्य नाही!
साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते.
‘एका पोलीथिन पिशवीने आपला ‘आ’ वासला आहे आणि ती संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करते आहे’ असे ते चित्र होते. कदाचित अजुनहि असेल. कारण परिस्थितीत चांगला स्वागतार्ह काहीही बदल झालाच नाही आहे उलटपक्षी ती हाताबहेरच गेली आहे की काय अशी शंका यावी. मधूनच जाग आल्यावर काही कडक नियम लागू केल्याचा फक्त आव आणला जातो.
चाळीतील आठवणी------भाग ४
चाळीतील आठवणी भाग १,२,३
पावसाळ्यात चाळीतल्या मुलींना घराबाहेर जास्त पडायला मिळायचे नाही.घराच्या छतावरून पडणार्या पाण्याच्या पागोळ्या पकडणे, अंगणातून वाहणार्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे,अर्थात तेही पायरीवर बसूनच,व्हरांड्यात चीपर्या खेळणे असे असे सगळे बंदिस्त खेळा खेळायचो.
प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह
फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली.
सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
हिवाळ्यातला लदाख - लेह प्रवेश, सिंधू दर्शन व चिलिंग कडे (भाग २)
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मिसळपाव