नाटक - कुछ मिठा हो जाये
तसं बर्याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं.
"कुछ मिठा हो जाये" ह्या नाटकाने सुरुवात एका अभिनव जाहिरातीने केली. नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीत नेहमी अभिनेत्यांचे फोटो असतात पण ह्या नाटकाच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये त्यांनी नाटकाच्या लेखकांचे फोटो छापले. आणि ह्या संकल्पनेचं श्रेय निर्मात्याचं. निर्माता संतोष घाणेकर आणि सहनिर्माती मोनिका धारणकर ह्यांचे समस्त लेखक मंडळींकडून आभार. त्यांनी लेखकांचा चेहरा पुढे आणला.
मिसळपाव

