एक संघ मैदानातला - भाग ५
धाप्प....
योग्याच्या पाठीत अप्पांचा दणकट हात पडला.. " काय गो बायं ... सकाळ सकाळ कशाला बेंबाटतसं..." आप्पांचा दणकट हात पाठीत पडल्यावर योग्याची चोच बंद झाली.. एकदम स्पिचलेस.. "काही नाही.. काही नाही सहजच आपलं ... " म्हणत मान सोडवून घेतली. आप्पांना काय समजायचे ते समजले होतं बहुतेक.. पण त्यांनी ते दाखवले नाही. सगळ्यांना वाँर्मअपला पिटाळले.
आम्ही वाँर्मअप करेपर्यंत आप्पा आणि बापू काही तरी बोलत होते. संजूचा सगळा जीव तिथेच अडकला होता. जास्त बोलायची बंदी असल्यामुळे मुकाट सगळ चालू होत. सगळ्यांनी आपापल्या बदलेल्या प्लेस घेतल्या कव्हर फिरवली. सगळ्यांना बरोबर उलट प्लेस दिल्या होत्या.
मिसळपाव
.
माझ्या लेकीचा एक लाडका छंद म्हणजे फ्रीज वर लावायला वेगवेगळी Magnets जमवणे. सुरुवात झाली ‘मदर्स डे’ ला मलाच एक भेट म्हणून देऊन. मग आम्ही साउथ आफ्रिका मधून एक आणले. असे करत करत बऱ्याच आठवणीना ह्यात गुंफत गेलो खरे तर फ्रिजवर लावत गेलो. अशीच एक आठवण आपल्या मुंबईची तिने आणली – ‘डबल डेकर बस’.
मला ‘बेस्ट’ कायमच द बेस्ट वाटत आली आहे. त्यातही ‘डबल डेकर’ खास प्रिय!