Skip to main content

३ सुत्रे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 14/05/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
हरयाणात हिस्सार रोड वर "लक्ष्मी प्रिसिजन" नावाचा एक कारखाना आहे..तिथे कामानिमित्त गेलो होतो कारखाना चालु असताना... तिथे गुप्ता नावाच्या एका बनिया समाजातल्या माणसाशी ओळख झाली व गप्पा सुरु झाल्या... हा समाज व्यावसायिक असल्याने त्याने ३ सुत्रे सांगीतली... १...साथी साथका..पैसा पास का.. २..वो सोना कीस कामका जो कान को काटे. ३..देन सच लेन झुटी... त्याचे निरूपणं असे... १...साथी साथका..पैसा पास का....आपणास अनेक दादा राम राम करणारे मित्र असतात..पण खरा मित्र तोच जो अडचणीच्या वेळी साथ देतो..नाहि तर म्हण आहेच.."फेसबुकावर हजार मित्र..बाहेर विचारत नाहि कुत्रं" पैसा पास का....म्हणजे व्यवसायात उधारी असते..अनेक

... काय म्हणतील!

लेखक रातराणी यांनी शनिवार, 14/05/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

अमलतास आणि आत्महत्या करणारे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/05/2016 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या रिज रोड वर शंकर रोड पासून बुद्ध गार्डन पर्यंत पसरलेले जंगल आहे. जंगलाचा चारी बाजूला भिंत आहे. हे वेगळे, भिंतीत कित्येक ठिकाणी भगदाड आहेत. गुज्जर लोक आपली जनावरे जंगलात चरविण्यासाठी या भगदाडांचा वापर करतात. रिजच्या बस स्टैंड वर तो उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत बायकोची एक जुनी साडी होती. भिंतीत पडलेल्या एका भगदाडातून आत जंगलात शिरला. दुपारचे १२ वाजलेले होते, त्यात मईचा महिना. ऊन मी-मी म्हणत होते. त्याचे सर्वांग घामाने भिजलेले होते. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला होता. आपल्या माथ्यावरचा घाम पुसत त्याने दूरवर पसरलेल्या जंगलावर एक नजर टाकली.

तुझी वाट बघता बघता........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 14/05/2016 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते प्रहरावर प्रहर उलटून जातात अन दिवसाची रात्र होते तूझ्या येण्याची चाहुल रातराणी हलकेच सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो अन चांदणीही मोहरुन जाते नकळत कुठुनसा अल्लड वारा ओठी गीत तुझे गुणगुणत येतो उगाच सैरावैरा पळुन वैरी उरी घालमेल वाढवून जातो आठवत नाही कितीवेळ मी इथे एकाकी नि:शब्द बसुन आहे वेड्यापरी इथे येणार्‍या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधत आहे रात्र चढता चढत जाते, मात्र तू काही येत नाही तुला न भेटता निघण्यास हे पाउलही मग धजत नाही तु न आलेली पाहून चांदणी ही आता हिरमुसली आहे तिची ती घालमेल पाहुन पहाटही वेशीवर विसावली आहे दर रात्री य

सैराट - अफाट स्टोरी टेलींग

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 14/05/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला...सैराट बघितला तेव्हा! प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

लेखक मार्गी यांनी शनिवार, 14/05/2016 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका आर्थिक विकासातला अनर्थ आज आपण ज्याला विकास म्हणतो, तो प्रत्यक्षात काय आहे? आज आपण म्हणतो की, अनेक देश विकसित आहेत आणि अनेक विकसनशील आहेत. किंवा अमुक सरकारच्या पाच वर्षांमध्ये राज्याचा काहीच विकास झाला नाही. विकासाचा 'अर्थ' काय आहे? विकासाची प्रचलित संकल्पना पश्चिमेकडून आलेली आहे आणि ती मुख्यत: आर्थिक विकासावर आधारित आहे.

विसराळूपणाचा आणि होणाऱ्या चुकांचा कंटाळा आलाय.

लेखक गोंडस बाळ यांनी शनिवार, 14/05/2016 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी खूप विसराळू माणूस आहे. अनेक गोष्टी मी हमखास विसरतो. फोन/इंटरनेट ची बिल भरण्यापासून ते अगदी ऑफिसमधली टाईम शीट भरेपर्यंत अनेक गोष्टी आहेत .. शिवाय कामाच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी विसरत राहतो. अगदी बायकोने फोन केला, येताना अमुक एक गोष्ट घेऊन या तरी मी अक्षरशः ती घोकत घोकत गाडी चालवतो. मध्येच traffic मध्ये अडकलो तर ते सुद्धा विसरतो. पुन्हा घरी आल्यावर मला अशी अपूर्ण कामे करायला परत जावे लागते. त्यातून कटकटी होतात, भांडण होतात. काय करावं तेच समजत नाहीये. माझ्या पत्नीला काही जबाबदाऱ्या घे म्हटले तर तिच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

अनुवादः तू भेटतेस अशी. मूळ कविता: जरूरी है

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 14/05/2016 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
"एस" यांची अनुवादित कविता: तू भेटतेस अशी जसा चंद्र तरंगतो-बुडतो शांत-स्तब्ध डोहात तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला जशी तू हृदयाच्या किती नकळत त्याच्या सर्वात खोल कप्प्यात उतरतेस अलवार तुला कसं जमतं गं? असं मला तुझ्या सोबत रहायला भाग पाडायला? तू सोबत हवीयेस जवळ हवीयेस. अशी. ..................................... मिसळलेला काव्यप्रेमी यांची मूळ हिंदी रचना: -जरुरी है..!! ठहरे हुए पानीमे तैरते डूबते चांद की तरह होता है तेरा मिलना कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है जैसे तू दिलकी सत

झिंग झिंग झिंगाट....सैराट ....!!!

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 13/05/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याच दिवशी सैराट पाहिला, त्यामुळे काहीही माहित नसल्याने भयंकर परिणाम झाला.अक्षरशः शेवट पाहिल्यावर तर एकदम गार पडलो. बराच वेळ कुणाशी बोललोच नाही. परश्या , अर्ची, लंगड्या अन साल्या एकदमच भन्नाट. त्याबद्दल काही लिहित नाही कारण मिपा वर त्याबद्दल पाऊस पडला आहे , अन मला भर घालण्यासारखे काहीच नाही. असो. खरे तर मला पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्या पात्रांचे आणि खुद्द नागराज चे मनोगत जाणून घ्यायचे होते . कारण सोशल मेडिया वर चाललेला धिंगाणा.

..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 13/05/2016 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
भरोसा करावा कुणाचा जरी.. भरोसाच नाही कशाचा जरी..! विचारेन त्यालाच कॉफी चहा घरी दूत आला यमाचा जरी मिळो गार माझी तुला सावली किती त्रास मजला उन्हाचा जरी मनी मान्य केले शशीचोर मी! खुळा आळ आहे नभाचा जरी. म्हणे वाघ गेल्याच जन्मातला अता जन्म आहे सशाचा जरी किती त्यात जो तो पुरा गुंतला खरा खेळ होता मनाचा जरी अरे वाकला तो कशाने असा.? तसा भार नव्हता जगाचा जरी! खरा भक्त त्याला मिळो एकदा तिथे प्रश्न असला युगाचा जरी! - कानडाऊ योगेशु