अनिला भाग 2
अनिला भाग 1 - http://www.misalpav.com/node/36145
मग मावशी जरा बोलती झाली. हि सुशीला गोडसे. माझी शाळेतली खास मैत्रीण. आम्ही दोघी एकाच शाळेत एकाच बाकावर बसायचो. 9 वर्षे रोज एकत्र असायचो. तिचे आणि माझे घर पण तसे जवळ जवळ होते. एकाच पेठे मध्ये. आम्ही सगळे शनिवारातले ना .सगळ्यांनाच पुराचा फटका बसलेला. ह्यांच्या कुटुंबांला तर फारच मोठा धक्का होता तो. तिच्या आई बाबांनी शून्यातून परत संसार उभा केला, पदरात पाच मुले. घर राहिले नाही म्हणून दुकानातच आडोसा करून संसार मांडला. हि सर्वात मोठी. हिचे लग्न मात्र पुराच्या आधीच फार घाई गडबडीत झाले होते.
मिसळपाव
अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.