Skip to main content

बादलीयुद्ध २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 31/07/2016 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक ------------------------------------------------------------------------------- होस्टेलवर मी येऊन पंधराच दिवसच झाले होते. त्यात माझा पार्टनर राजेश सोडून गेल्याने खोलीत मी एकटाच असायचो. कॉलेजसाठी फक्त एक वही विकत घेतली होती. बाकी कशाचाच पत्ता नव्हता. रात्री खाटंवर पडल्यावर वहीवर मी उगाच रेघोट्या ओढत बसायचो. चित्रं काढायचो. वरच्या रकान्यात डोंगर काढणे हा माझा आवडता खेळ. सुरुवातीला चारपाच डोंगर काढायचे. मग दोन डोंगरांच्या मध्ये अजून एक बारका डोंगर. मग मोठ्या आणि बारक्या डोंगरामध्ये अजून एक चौथा डोंगर.

मी थेंब की झाड की माणूस ??

लेखक फुंटी यांनी रविवार, 31/07/2016 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
भर पावसात झाड निश्चल उभी आहेत.शब्दशः एकही पान हलत नाही.स्थितप्रज्ञतेने बरसणार्या पावसाचा जणू स्वीकार करत आहेत. मी माणूस रहात नाही पण मग मी एक थेंब की झाड ? की दोन्ही ? हं आता लिहिताना माणूस झालो पुन्हा.झाड लिहू शकत नाहीत.अनुभवत असतातच.पाऊस बरसत असतो .तोही लिहू शकत नाही... खोताचा प्रभाव पडतोय माझ्यावर...की श्याम मनोहरांचा...झाडांना आणि पावसाला प्रभावाच काही पडलेल नाही.मला पडलय मी माणूस आहे..

एन्टरप्रेन्युअर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 31/07/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

खड्डारी

लेखक फुंटी यांनी शनिवार, 30/07/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
Dedicated to Mumbai खड्डे ... वाटेवर खाडे चुकवीत चाललो वाटले जसा फुल टाईट जाहलो मिसळुनी ट्रँफिक मधी, एक हात सोडूनी कधी आपुलीच सेल्फ स्टार्ट कधी मारित चाललो पुढचा ब्रेक दाबीत , मागचीचा ऐकीत हाँर्न तोंडातच शिव्या घालित चाललो करूनि मान तिरकी ,परि ती दिसेना मिररवरती अलवार आरसा फिरवित चाललो चुकली तालात कट, पडला बोनेटला स्क्रँच ढळलेला तोल सावरीत चाललो खांद्यावर बाळगिले ओझे सँकचे फेकून देऊन आता परत चाललो

न्यायालयाच्या पायरीवर....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 30/07/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रँझ काफ्काच्या एका कथेवर आधारीत.... न्याय... सगळीकडे अंधुक प्रकाश पसरला होता आणि मोठ्या मुष्किलीने पुढचे दिसत होते. अतीश्रमाने त्याला चक्कर आली होती का त्या अंधारामुळे त्याला दिसत नव्हते हे त्याला कळत नव्हते. त्याला एकदा वाटत होते की तो एक उंच मिनारापाशी उभा आहे. त्या मिनाराला एक दरवाजा होता आणि त्याच्यावर पाच गरुडांचे पुतळे. मोठ्या डौलाने ते सोनेरी प्रकाश फेकत होते. ‘ ‘हं ऽऽऽ पोहोचलो एकदाचा !’’ तो मनाशी म्हणाला. गेले कित्येक दिवस तो अखंड प्रवास करुन या न्यायगृहासमोर उभा ठाकला होता. त्याने एकदा दरवाजासमोर उभे ठाकलेल्या दरवानाकडे नजर टाकली आणि लगेचच चुकविली.

तो प्रसंग

लेखक vcdatrange यांनी शनिवार, 30/07/2016 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
अत्ययिक अवस्थेत वैद्यकीय सेवांचे नियोजन असा आम्हा मंडळींना न आवडत्या विषयाची मांडणी करत असताना तो प्रसंग पुन्हा आठवला. १३ वर्ष झाली मागिल कुंभमेळ्याला. संघटनेचे पदाधिकारी असल्याने अगदी रामकुंडापर्यंत सहज फिरता यायचं. आम्ही सकाळीच जाऊन बसलो. गर्दी प्रचंड होती. महापौरांच्या जथ्यात सामिल होऊन सर्व परिस्थितिचा आढावा घेवुन (म्हणजे काय केले, त्या बापुड्या महापौरास आणि लस्सीवाल्या पांडेलाच माहित) घाटाच्या पाय-यांवर ठाण मांडला. एक एक आखाड्याचे साधु यायला सुरुवात झाली. गम्मत म्हणजे महापालिकेतर्फे Live Commentary सुरु होती या सगळ्याची.

ग टा री...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 30/07/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लास झाले रिते सारे भरा पेग तो नवा रे भास अन आभास आता संगतीला हवा रे .. रात्र चढली अंगावरती जरा सावरा जिवा रे अंधाराच्या सोबतीला लुकलुकणारा दिवा रे... किती रिचविले हे आम्ही ग्लास ऐसे किती उधळिले त्यावरी वेळ पैसे किती रात्री आम्ही असे टुन्न झालो रिते ग्लास ते पाहुनी सुन्न झालो...

(आरोळ्या जालीय फेरीवाल्यांच्या)

लेखक खेडूत यांनी शनिवार, 30/07/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (सदर धाग्याच्या लेखिका आदरणीय आणि सिनियर मिपाकर आहेत. आम्ही त्यांच्या लेखनाचे पंखा आहोत - त्यामुळे धागा टाकताना दोन दिवस विचारच करत होतो - पण आशा आहे की त्या स्वतः आणि ज्यांच्याकडे कळत नकळत निर्देश होते ते सगळेही ह.च घेतील.) पूर्वी निवडक संस्थळे सोडली तर इतर चेपू समूह , संस्थळांवर आतासारखी जिलब्यांची बाजारपेठ खूप कमी होती. मिपा तर अस्तित्वातच नव्हते. पण एकदा मिपा सुरु झाल्यावर मग काही नित्य गप्पांसाठी मिपावर येणार्‍या फेरीवाल्यांची - आय मीन आयडींची आतुरतेने वाट पाहिली जायची.

अस्वस्थामा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 30/07/2016 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आभासी सुखाची शंभर शकले डोक्यावर मिरवत फिरत होता एक उन्मत्त अश्वत्थामा... पोतडीतले उद्याच्या चिंतेचे बाटलीबंद भूत पाठीवरल्या गाठोड्यातून शोधत होते सुटकेचा रस्ता ... निराश सुस्काऱ्याचे फवारे शकलांच्या सुकल्या खपल्या भेदून चौफेर उसळत धावत सुटले भळाळत्या चिळकांड्या कारंजी होऊन नाचू लागल्या... बाटलीतलं भूत बाहेर काढून रिती बाटली फिरवत अस्वस्थ अश्वत्थामा फिरतोय दारोदार, तेलाची भीक मागत... बाटलीतलं भूत आता मानगुटीवर बसलंय!!

अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/07/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला. निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच. आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे बघू. दिल्ली देशाची राजधानी.