Dedicated to Mumbai खड्डे ...
वाटेवर खाडे चुकवीत चाललो
वाटले जसा फुल टाईट जाहलो
मिसळुनी ट्रँफिक मधी, एक हात सोडूनी कधी
आपुलीच सेल्फ स्टार्ट कधी मारित चाललो
पुढचा ब्रेक दाबीत , मागचीचा ऐकीत हाँर्न
तोंडातच शिव्या घालित चाललो
करूनि मान तिरकी ,परि ती दिसेना मिररवरती
अलवार आरसा फिरवित चाललो
चुकली तालात कट, पडला बोनेटला स्क्रँच
ढळलेला तोल सावरीत चाललो
खांद्यावर बाळगिले ओझे सँकचे
फेकून देऊन आता परत चाललो
वाचने
814
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन आहात लगेच कशाला जाता...
सदस्य काळ पहा हो नवीन कोण
In reply to नवीन आहात लगेच कशाला जाता... by लालगरूड