Skip to main content

प्रकाश प्रदूषण - ज्योतिर्मा तमसो गमय।

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 18/03/2024 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही.

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग २

लेखक गोरगावलेकर यांनी रविवार, 17/03/2024 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ येथे वाचा कशेळीहून गणपतीपुळेला निघालो. सागरी किनाऱ्याच्या रस्त्याने प्रवास करत वाटेत जमेल तेव्हडी ठिकाणे पाहणार होतो. कशेळीजवळ कातळशिल्प आहेत ती बघायची होती. शिल्प मुख्य रस्त्यापासून थोडी दूर आहेत. थोडे अंतर पायी चालावे लागते. चालायची तयारी होती पण कोणी वाटाड्या मिळाला नाही म्हणून विचार रद्द केला. कशेळी हे कनकादित्य मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरी येथे अजून एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. थोड्याच वेळात येथे पोहचलो.

रेल्वे रिटायरिंग रूम्स

लेखक अक्षय देपोलकर यांनी शनिवार, 16/03/2024 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात. तीन तासापासून ते चौवीस तासापर्यंत आपल्या गरजेनुसार बुक करू शकता. फ्रेश होण्यासाठी दोन्ही प्रकारात स्वच्छ बाथरूम, टॉयलेट आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असते. डिलक्स रूम ३ तासासाठी ५०० रुपये आणि डॉर्मिटरी बेड ३ तासासाठी १८० रुपये एवढा नाममात्र दर* आहे. आपल्या गरजेनुसार (३,६,१२,२४ तास) रूम किंवा बेड बुक करू शकता.रूम बुक करताना तिकिटाचा पीएनआर नंबर आणि ओळखपत्र द्यावं लागतं.

जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

लेखक मिसळपाव यांनी शनिवार, 16/03/2024 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख मी ऐसीवरच्या दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी यांच्या वतीने, त्यांच्या विनंतीनुसार ईथे देत आहे कारण काही तांत्रिक समस्येमुळे त्याना ईथे वितरीत करता आला नाहीये) ---------------------------------------------------------------------- नमस्कार! आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते.

पाकिस्तान-८

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शुक्रवार, 15/03/2024 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
“आम्ही काश्मीरसाठी हजार वर्षे लढू. आम्हाला गवत खावे लागले तरी चालेल. आम्ही अणुबॉम्ब बनवू.” - झुल्फिकार अली भुट्टो. युध्द सैन्याला नाही तर राजकारणाला हवं असतं. अयुबखान येताच युद्धाची शक्यता दिसू लागली. अखेर पाकिस्तानात लष्करी राजवट आली होती. पण जवळपास दशकभर मोठे युद्ध झाले नाही. संधी होत्या, तरीही झाले नाही. असू शकतं की अयुब खान अमेरिकेकडून पुरेश्या शस्त्रांचा जुगाड करत असेल त्यामुळे झाले नाही किंवा अमेरिकेने त्यांना रोखल्यामुळे झाले नाही. पण एका सैनिकाला दहा वर्षे काश्मीर जिंकावेसे वाटले नसेल का? युद्ध लढावेसे वाटले नसेल का?

12/P पॉन्स- ब्रूक्स धुमकेतू बघण्याची व त्याचा फोटो घेण्याची संधी!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 15/03/2024 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
✪ सूर्यास्तानंतर थोड्या वेळानंतर हा धुमकेतू बायनॅक्युलरने बघता येऊ शकतो ✪ प्रकाश प्रदूषण नसलेल्या व अंधारं आकाश असलेल्या जागेवरून बघता येईल ✪ स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफ घेता येईल. ✪ धुमकेतू बघण्यातला रोमांच! ✪ धुमकेतू 30 मार्चला अश्विनी ता-याच्या अगदी जवळ असेल सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की, सध्या 12/P पॉन्स- ब्रूक्स नावाचा धुमकेतू दिसत आहे. 12/P म्हणजे ज्याचा अवधी शोधला गेला होता, असा हा 12 वा धुमकेतू होता. हा धुमकेतू 71 वर्षांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. गेले अनेक शतकं त्याचं निरीक्षण केलं जात आहे.

माझे बाबा

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 15/03/2024 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal".

अपहरण - भाग ९ (अंतिम)

लेखक स्मिताके यांनी मंगळवार, 12/03/2024 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ - https://misalpav.com/node/51997 अमेरिकेने पेटॅगोनियावर अचानक हल्ला केला होता. त्यामागचं कारण मात्र लज्जास्पद होतं. राष्ट्रप्रेमाने चुकीचं टोक गाठल्यामुळे ही परिस्थिती ओढवली होती. त्यातून आणखी शरमेची गोष्ट अशी, की पेटॅगोनियाजवळ अमेरिकेहून जास्त जहाजं होती. नौदलाच्या तळांवर एकच गोंधळ उडाला होता. पोटोमॅक नदीवरच्या तळावर तर खासच. जुन्यापान्या पहाऱ्याच्या नौकांना नवी झिलई देऊन नौदलात भरपूर नवी जहाजं असल्याचा आभास निर्माण केला जात होता. हजारो मैलांवरच्या शत्रूच्या किनाऱ्यावर हल्ला करण्यासाठी बंदुका पाठवल्या जात होत्या.

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग १

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 11/03/2024 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारीत बातमी आली की महिला दिनानिमित्त १ मार्च ते ८ मार्च दरम्यान MTDC च्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये बुकिंग कारणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट दिली जाईल. निश्चित कोणा कोणाला सूट मिळेल ते बातमीतून समजत नव्हते. मंडळाकडे चौकशी केली असता कळले कि ज्या महिलेच्या नावावर बुकिंग आहे तिच्या सोबत पुरुष व्यक्तीही येऊ शकतात. अट मात्र अशी होती की जिच्या नावावर बुकिंग आहे ती महिला हॉटेलमध्ये प्रवेश करते वेळी तेथे हजर असावी. व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा होऊन आम्हा तीन मैत्रिणींच्या नांवे गणपतीपुळे आणि हरी हरेश्वर या दोन ठिकाणी एक एक मुक्कामासाठी रुमही बुक झाल्या. तिघींचे नवरे सोबत येणार होते.