आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग २ उत्तरार्ध
मागील भागाची लिंक http://www.misalpav.com/node/37121
दिवस २
काल चा दिवस थोडा धावपळीत गेला होता त्या मुळे मस्त झोप झाली होती. सकाळी अपार्टमेंट वर च नाश्ता करून आम्ही १० ला निघालो ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अपार्टमेंट ला परत यायचे असे मला सांगण्यात आले (जणु काही प्रवासात माझ्या मुळे च उशीर होतो.) कालच्या प्रमाणे आज पण मला कुठे जायचे आहे याची फारशी कल्पना नव्हती. मग प्रिया ने तिच्या 'Bucket List' मधील एक जागा मला सांगितली. तर आज आम्ही जाणार होतो 'अल्पाईन कोस्टर ग्लेशीयर ३००० ' ला.
मिसळपाव