चार्ल्स बुकोवस्कीचं शेवाळं : भाग २
भाग १
------------------------------------------------------
चार्ल्स बुकोवस्कीबद्दल वाचताना आणि लिहिताना त्याची अजून ओळख करून घेण्यासाठी त्याच्या कविता वाचायला सुरुवात केली. शाब्दिक पाल्हाळाविना, यमक गमकाशिवाय लिहिलेल्या त्याच्या बहुतेक कविता स्वतःशी वाचणंसुद्धा सोपं नाही. अकारण नजरेत रोखून बघणारी व्यक्ती जशी समोरच्याला अस्वस्थ करते, तसं वाटायला लागतं.
त्यातल्या त्यात सौम्य अशा आणि जालावर उपलब्ध असलेल्या काहींचा भावानुवाद इथे द्यायला सुरुवात करत आहे.
मिसळपाव