Skip to main content

शब्द

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 29/09/2016 03:54 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द

लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी… संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत, जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची, कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये, त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…!
काव्यरस

ती - ८

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 29/09/2016 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती" - ४ "ती" - ५ "ती" - ६ "ती" - ७ ती - ८ प्रकाश म्हणाला की, "नेहाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत." बोरीवलीतील साहेब आमच्या तोंडाकडे बघायला लागले. साहेबांनी मला आणि सुशांतला बाहेर नेले आणि सांगीतले की प्रकाशचे वडील त्या भागातील एक प्रतीष्ठीत व्यक्ती आहेत.

रिहॅब चे दिवस (भाग ५ )!!!

लेखक वरुण मोहिते यांनी गुरुवार, 29/09/2016 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
असेच दिवस जात होते. २६ वा दिवस उजाडला एक फोन करण्याची परवानगी घेतली . वर गेलो ऑफिस मध्ये आईला फोन लावला . एकट्याला बोलण्याची परवानगी नव्हतीच. फोन एकीकडे आणि रिसिव्हर आपल्याकडे असं होतं. मध्ये ग्रील त्यामुळे वैयक्तिक काही बोलता येणं कठीण होतं. तरीही मी नेटाने माझा मुद्दा बोलो मला काय वाटतं आणि मी परत असं करणार नाही या प्रकारचं. आईने एकच प्रश्न केला काय काम आहे . एका क्षणात बहुराष्ट्रिय कंपनी मध्ये असलेली नोकरी, आपला घरचा व्यवसाय त्या जीवावर आपण दाखवलेला माज गळून पडला. मी पुढे बोलो तरी.." ओके ठीक आहे" डॉक्टरांशी बोलते मग बघु हेच उत्तर आलं .

पावन

लेखक निओ यांनी गुरुवार, 29/09/2016 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली होती. आभाळ सर्वदूर व्यापून होते. रप् रप् पाऊस झाडा झुडुपात, चिखलात वाजत होता. घोडखिंडीतील पाणी आता लाल होऊन वाहत होतं. वरनं पावसानं आणि खालनं मावळ्यांनी घोडखिंडीत झुंबड उडवली होती. तलवारींच्या खण् खणाटांनी आणि आरोळ्यांनी खिंड दणाणून गेली होती. हबशी सिद्दी मसूद आणि त्याची रानटी फौज पुढे घुसायचा प्रयत्न करीत होती. बांदलसेना हर प्रकारे तो हाणून पाडत होती. मराठयांच्या राजाचा जीव धोक्यात होता. तो वाचवण्यासाठी मावळे पराक्रमाची शर्थ करत होते तर आपल्या सरदाराची अब्रू वाचवण्यासाठी मसूदची फौज झगडत होती. हिरडस मावळातील बांदलसेना जीवावर उदार होऊन लढत होती.

‘व्हॉय वी ट्रीट एनीमल्स लाइक एनीमल्स’-रैक्स हैरिसन

लेखक महामाया यांनी बुधवार, 28/09/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अविस्मरणीय हाॅलीवुड/ सहा- डॉक्टर डूलिटिल चा सवाल आपण जनावरांसोबत जनावरां सारखं कां वागतो...!

खरा खुरा रंगमंच ..... !

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
खरा खुरा रंगमंच ..... ! हुरहूर मनात घेऊन वेशभूषेत मग्न कधी तर कधी चेहऱ्यावर रंग उमटवलेला ! संगीताच्या तालात दंग कधी तर कधी रंगीत छटांचा प्रकाशात रमलेला ! अभिनयास सज्ज कधी तर कधी नुसताच प्रेक्षक बनलेला ! हा रंगमंच !

ठिकरी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 28/09/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/09/2016 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... " 'त्याच्या' दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे राधा फक्त पाहत राहायची ..... रिकामं केलेलं मन पुन्हा एका नजरेने गच्च भरून जायचा .... तो वेड्या मनाला आता परत कसं सावरावं ? ना तिच्याकडे उत्तर .... ना 'त्याच्या'कडे मनामनांवर राज्य करणारा तो जगाचा रक्षण करणारा तो , प्रत्येक जीवात वास करणारा तो, विश्वविधाता तो , त्यालाही प्रश्न पडावा ? हे कसले 'प्रेम' ? केवळ अढळ विश्वास , जीवाला घोर लावणारी हुरहूर, डोळ्यात प्राण आणून वाट पाहायला लावणारी आस , फक्त एका क्षणाच्या भेटीसाठी ? बस्स!!

पाश्चिमात्य साहित्य

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 27/09/2016 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते.

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 27/09/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.