आवेग हृदयाचा की मनाचा असावा
मी श्री समर्थांना म्हणालो,
“कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात .
तसंच असेही लोक असतात जे फक्त उदिष्ट सफल करण्याचा जुजबी प्रयत्न करत असतात.आणि नंतर ठराविक वेळ प्रयत्न करून झाल्यावर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि निश्चिंत होतात.
खूप उशीर होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला बांधून ठेवत नाही.
किंबहुना,त्याने कधी थांबायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो त्याची शक्ती, वेळ आणि स्वत:ची भावना ओळखून असतो.