Skip to main content

(मी आणि बार)

लेखक अहिरावण यांनी मंगळवार, 07/05/2024 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - ओळखलेच असेल निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता.. मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते. मला असं वाटतं की बारकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही पनवेलला गेलो होतो,तो बार वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो. पण गावातला, माझ्या घरा जवळचा बार मला निराळा वाटायचा. पहाटपर्यंत बसु शकतो, सर्वत्र टेबल होते आणि खुर्च्या बेवड्यांनी भरलेल्या होता.

लिव अंधभक्ता लिव

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 07/05/2024 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/05/2024 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं. मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?

तरी हरकत नाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/05/2024 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजेल का?

अरे संस्कार संस्कार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/05/2024 05:53 या दिवशी प्रकाशित केले.
अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर हातात पडती डॉलर करा त्याचा नीट वापर !!१!! अरे संस्कार संस्कार हॉटडॉग बरा म्हणू नये मेगडॉनल्ड मधे जाऊन बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!! अरे संस्कार संस्कार शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून तिकडे भारतात करा त्याचे डिट्टो अनुकरण !!३!! अरे संस्कार संस्कार खोटा कधी म्हणू नये रीत अन रिवाजाला छोटा कधी म्हणू नये !!४!! अरे संस्कार संस्कार घेता कर्ज क्रेडीट कार्डावर त्याच महिन्या अखेर टाका फेडून सर्व उदार !!५!! अरे संस्कार संस्कार आहे मोठा जादूगार असे जीवनाचा मंतर ठेवा त्यावर मदार !!

काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 06/05/2024 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो. योगायोगाने,ती अमावास्येची रात्र होती.उशिरा घरी आल्यावर,जेवण आटोपून झोपण्याच्या उद्देशाने,पाठ टेकून डोळे मिटून मनाने परत चौपाटीवर गेलो.आणि डोक्यात विचार यायला लागले. आकाशात काळ्याकुट्ट रात्री, म्हणजेच अमावास्येच्या रात्री, ताऱ्यांकडे पाहण्यात,कल्पनेच्या आधाराने त्यांच्या जवळ पोहोचण्या

माझी नर्मदा परिक्रमा : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण

लेखक Narmade Har यांनी सोमवार, 06/05/2024 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व ) आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही .

पेय निघून गेले (विडंबन)

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 06/05/2024 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: ते दिवस निघून गेले टेबलावर प्याले आपटून आणखी-आणखी भरण्याचा हट्ट करून धुंद धुंद होत रिचविण्याचे ते दिवस निघून गेले. मित्रांमध्ये पिऊन-पाजवून विकांताला पार्ट्या करून तरीही बुधवारी नाइन्टी मारण्याचे ते दिवस निघून गेले. थोडीशीच वोडका पिऊनसुद्धा आपल्या घरी जाऊन बायकोचा ओरडा खाण्याचे ते दिवस निघून गेले.

मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास

लेखक माहितगार यांनी सोमवार, 06/05/2024 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या एकात्मतेसाठी सीमेवर लढणार्‍या वीरांना मानवंदना नेहमीच देत असतो त्यांचे लढणे जसे समोर दिसते कौतुकही समोरून मिळते याच भारतीय एकात्मतेच्या लढायांना कानांची गरज असतेच गुपचरांच्या सगळकाही जीवन, कुटूंब, पणावर लावून कौतुकाचे दोन शब्दही लाभतील याची शाश्वती नसतानाही कधी आप्तस्वकीयांकडूनच नादान टिका ऐकुनही निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रांनो स्विकाराव्या आमुच्या अनेक यशस्वीभव शुभेच्छा आणि साश्रू मानवंदना त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!! प्रेर्ना अर्थातच