" सचिन सचिन "
सचिन ए बिलियन ड्रीम्स ..हा फक्त सचिन चा चित्रपट नाही तर सचिन आणि क्रिकेट सोबत आपण जे क्षण घालवले त्याची उजळणी आहे.
क्रिकेट समजण्याआधी सचिन समजला होता, त्यामुळेच की काय सचिन बद्दल जरा जास्तच आकर्षण होते. आपल्या देशातील करोडो लोकांमध्ये २५ लाख लोकांचे नाव तरी सचिन असण्याला हाच कारणीभूत असावा असे मला वाटते. त्याने घातलेल्या जर्सीवरील १० नंबर पण इतका आकर्षित करायचा की मी खो खो खेळताना पण माझ्या जर्सीवर १० नंबर हवा असा आग्रह धरायचो. शाळेत असताना मॅच सुरु आहे म्हटल्यावर सुट्टीमध्ये शेजारील घरी जाऊन सचिन कितीवर खेळतोय याची पहिली चौकशी करायचो.
मिसळपाव