Skip to main content

पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा

लेखक नूतन यांनी शनिवार, 22/06/2024 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो.‌ लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या  "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो. एका रात्री आम्ही  आसपास फिरता फिरता ,आज ' टाइमपास'  कसा करावा  याचा विचार करत होतो.माझा दोस्त म्हणाला,  ‌चल "फ्रॅस्कॅटी" त जाऊ.( फ्रॅस्कॅटी हा १९व्या शतकातील, पॅरिस मधील एक प्रख्यात कॅफे व सोशल क्लब होता. तिथे उच्चभ्रू वर्गातील पुरूष व स्त्रिया येत.

गोष्टी कृष्णाच्या १

लेखक Bhakti यांनी शनिवार, 22/06/2024 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात. संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते. फोटो -कृष्णा @मथुरा अ कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा.

माझी योगचर्या

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 21/06/2024 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगासनाची माझी रीत न्यारी डसेन जिव्हारी नकळत ॥१॥ शीर्षासन तर माझे आवडते नको ते उलटे पाहतो मी ॥२॥ "धनुरा"सनाची सवय लाविली "मशाल" फेकली दूरवर ॥३॥ सध्या "पद्मा"सन घालतो मुकाट ED चे झेंगट कोणा हवे? ॥४॥
काव्यरस

डार्कलँड

लेखक भागो यांनी गुरुवार, 20/06/2024 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते. व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच. पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, “मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.” लोकांना उगीचच थांबायला लावणे यात अवर्णीय आनंद असतो. आपण सगळीकडे थांबत असतो.

तीळाचे लाडू

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 20/06/2024 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात. तीळाचे लाडू १५० ग्रैम अर्धवट भाजलेले तीळ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी सुके खोबरे अर्धी वाटी गुळ आठ- दहा खजूर दहा बारा बदाम इलायची A सर्व जिन्नस मिक्सरमधू

बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 19/06/2024 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उह

अज्ञाताचे लेख

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 19/06/2024 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा । अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ -ग्रेस मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा". 'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.

सद्दीत सुमारांच्या ह्या

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 18/06/2024 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
जटिलाच्या दारावरती दुर्बोध देतसे थाप भेटीत उमजले दोघा, "उभयतांस एकच शाप सद्दीत सुमारांच्या ह्या उ:शाप नसे शापाला अस्वस्थ उद्याची हाक ऐकू ना येई कुणाला" दुर्बोध जटिलसे हसले दुर्बोधून जटिलही गेले अन् विषण्ण होऊनी दोघे आश्रयी कवीच्या गेले :)