Skip to main content

भीमाशंकर - सायकल सफर

लेखक दो-पहिया यांनी गुरुवार, 06/07/2017 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! मी मिसळपावचा जुना वाचक जरी असलो तरी सदस्य म्हणून नवीनच आहे. नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉग मुळे मिसळपावच्या सरपंचांशी ओळख झाली आणि त्यांच्या सुचनेनुसार मी माझा लेख येथे देत आहे. भीमाशंकर बद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. आमच्या ऑफिसमधील एक सहकारी नुकताच जाऊन आला होता. त्याने केलेलं वर्णन ऐकल्यापासून भीमाशंकरला कधी एकदा जातोय असं झालं होतं. पण गाडी न काढता सायकलने जायचा बेत होता. पुण्यापासुन भीमाशंकर १०० किमी आहे. शनिवारी निघून रविवारी परत यायचे. जाऊन येऊन २०० किमी.

चायना आणि चुंबी (३) संधी मुत्सद्देगिरीची

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/07/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
डोकलामच्या टापूवर रस्त्याच्या बांधणीची चीनची वेळ चुकली का ? माहित नाही, शस्त्रास्त्र स्पर्धेत चीन भारतापेक्षा आघाडीवर असला, आणि डराकाळ्या कितीही फोडल्या तरी याक्षणी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत प्रत्यक्षात अडचणीत आहे. इथे ९९ गुण डोवाल डॉक्ट्राईनला १ गुण आमेरीकनांच्याही अडकलेल्या हाताला. दोन देशात खरेच युद्ध झाले तर आर्थीक आणि जिवीत हानीची दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागेल हे खरे असले तरी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत एखाद्या वस्तुचा सौदा करण्याचा प्रयत्न करतो तशी स्थिती असते. बाजारातला सौदा फिस्कटला तर युद्धे होत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणात सौदा होऊ शकला नाही तर युद्धापर्यंत गोष्ट जाऊ शकते.

नविन लेखमलिका :’हॅरी पॉटर’

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 06/07/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगात सगळ्यात सुखी पिढी कुठली असेल तर ९० च्यां दशकात जन्माला आलेली, आमची पिढी...!! ज्या काळात जन्माला आलो त्यात खरं तर नुकत्याच ब-याच नवनवीन गोष्टी आल्या होत्या ... मग टीवी असेल, कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल.....पण हे सगळ काही बालपणी जास्त शिवलं नव्हतं आम्हाला. भर उन्हाळ्यात अख्खी दुपार खेळण्यात घालवणे, सूर-पारंब्या, विटी-दांडू, कबड्डी, असे नानाविध खेळण्यात गेलं. सचिन-सौरभ-राहुल-अजहर हे हिरो असेल तरीही क्रिकेट सुद्धा फार मोठ स्थान काही बळकावू शकलं नव्हतं.

आठवणींचा पाऊस

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 06/07/2017 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी तू जवळ असतांना ओला चिंब करायचा मला तुझ्या प्रेमाचा पाऊस आज तू दूर असतांना अश्रूंनी चिंब करतोय मला तुझ्या आठवणींचा पाऊस

कार्टूननामा-०२ (संपुर्ण)

लेखक औरंगजेब यांनी गुरुवार, 06/07/2017 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक http://www.misalpav.com/node/40059 http://www.misalpav.com/node/40097 टीप:-मागील भागात आलेल्या प्रतिक्रिया वाचून ह्या भागापासून मी ह्या लेखमालेचा ढाचा बदलणार आहे नुकतीच भारतातील टॉप १० कार्टून्स ची लिस्ट प्रसिद्ध झाली आहे.

नियतीचा खेळ (एकच चारोळी दोन पद्धतीने)

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 06/07/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
*** विसरण्याची तुला वेळ येते तोवर का नियती आणते तुला अचानक माझ्या समोर *** आपले मिलन शक्य नाही हे जाणून जेव्हा येते तुला विसरण्याची वेळ तेव्हा तुला पुन्हा पुन्हा माझ्या समोर आणून का खेळते नियती असा भावनेशी खेळ

वस्तुमान व वजन (Mass and Weight)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 06/07/2017 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजा विक्रम अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त साधून पुन्हा त्या पिंपळाखाली आला. मागील वेळी झालेल्या बोलण्याच काही बोल अजूनही त्याच्या मनात रुंजी घालत होते. तो त्याबद्दलच्या विचारातच होता इतक्यात ते वेताळाचं विकट हास्य त्याच्या कानी पडलं. “ कसला विचार करतोयस राजा? अजूनही मागील बोलण्याचाच विचार करतोस असं दिसतंय. मागील वेळी तू विस्थापन (displacement) सदीश (vector) गोत्री राशी आहे असे काहीसं बोलत होतास आणि झालेलं विस्थापन कार्यकारी बळाच्या दिशेतच (Resultant force) होतं असंही म्हणालास. काय घोळ आहे हा?

रेकी करताना आलेले अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय अनुभव.

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 05/07/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी रेकीची 'लेवल १' ही दीक्षा घेतली आहे.रेकी हे एक विज्ञान आहे असे मी मानतो,रेकीला मी कुठल्याच देवाशी कींवा धर्माशी जुळत/जोडत नाही.आता सरळ अनुभव लिहतो.ईथे मी फक्त प्राण्यांसंबधीत आलेले अनुभव लिहत आहे. १) सोनु व ढींगण्या : माझ्या पाळलेल्या पोपटांपैकी नर म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी पिंज-याजवळ जाउन पिंज-यात हात टाकुन त्याच्यापाठीवर रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते.सोनु खुप दीवसाने मी हात फीरवत आहे म्हणुन मला ओळखीचे असे प्रेमळ आवाज काढत होता.अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण खाली घातली व मध्

ईयत्ता नववीचा नवा पुरोक्रम

लेखक माहितगार यांनी बुधवार, 05/07/2017 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
नेमेची येतो पावसाळा तसे पावसाळ्या सोबत शाळाही सुरु होतात, काही ईयत्तांना नवे अभ्यासक्रम बदलून मिळतात. तसे या वर्षीचा नववीचा बदललेला अभ्यासक्रमाची पुस्तके नजरे खालून घातली. इंग्रजी गणितासारख्या काही विषयांचे अभ्यासक्रमातील बदल नक्कीच चांगले आहेत.

II मास्तर म्हणतात पोरांना , पिरेम लय वाईट II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी बुधवार, 05/07/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तर म्हणतात पोरांना पिरेम लय वाईट करू नका कधी तुम्ही जाल सर्व खाईत II झाडे लावा, गुरे चारा मायबापास पोसा पिरमामध्ये हे शक्य नाय मग का स्वतःस कोसा ? पिरेम पिरेम करता करता माझी बिनपाण्याची झाली सोन्यासारखी नोकरी जाउनी घंटा हाती आली II हाती छडी अन टोपी घेऊनि शाळेमंधी जातो डोक्याला मॉप शॉट लावूनी घरी घ्यायला परत येतो II पगारपाणी ना येळेवरती वाढला भांडणतंटा छडी घेऊनि फक्त बडवितो म्या शाळेमधली घंटा II सिद्धेश्वर विलास पाटणकर C