"जलवंती" वर प्रवेश करण्याआधीचे इशारे
महासागराचे अथांग पाणी........
संकटे एकटी कधीच येत नाहीत
पाण्याइतक्याच खोल अशा नियतीची सदैव साथ घेऊन येतात
वरचे असीम आकाश.......मनातल्या साऱ्या आकांक्षा चुरडून टाकणारी निराशेची पोकळी
दूर राहिलेला किनारा.......कधीकाळी पाहिलेली स्वप्ने ........
आठवणीतच राहिलेले आप्तस्वकीय
तरीसुद्धा
तरीसुद्धा
प्रवास कुणी टाळत नाही
पाय थांबत नाहीत
हात थकत नाहीत
डोळे शिणत नाहीत
मन मात्र स्वप्नांचे पंख लावून दिशाहीन असीम आकाशात विहार करतच रहाते
अशा प्रवासाला शेवटचा मुक्काम नसतो
असते ती फक्त अर्ध्यातून सुटलेली सोबत
कधी घरादाराची
कधी सख्या-सवंगड्यांची
जिवलगांची
कधी कधी तर स्वतःची सुद्धा.
मिसळपाव