Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 22/09/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गहन हे मर्म दु:खाचे उमजणे कठिण किती असते साचले युगांचे अवघे निमिषात अश्रुरूप घेते उफराटे गणित विषाचे समजणे कठिण किती असते मरण्यास पुरे इवलेसे जगण्यास कितीही कमी पडते शब्दांच्या निबिड अरण्यी बहरणे कठिण किती असते अमरत्व उमलण्या आधी का मरण विकटसे हसते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1078
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया