Skip to main content

वर्ष-अखेरच्या सुट्टीसाठी ठिकाण सुचवा

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 28/09/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघे नवरा-बायको आणि दीड वर्षाच्या जुळ्या मुली, कुठेतरी निवांत ठिकाणी जायचं म्हणतोय. २३ डिसेंबर ते १ जानेवारी असा कालावधी उपलब्ध आहे; तरी त्यातल्या त्यात गर्दी कमी असावी म्हणून २६-३० डिसेंबर असा ४-५ दिवसाचा प्लॅन करावा असं डोक्यात आहे.(मागे पुढे करू शकतो) मुली लहान असल्यामुळे खूप दगदगीचा प्रवास नकोय आणि स्थलदर्शन पेक्षा निवांत वेळ घालवणे हा हेतू आहे. त्या दृष्टीने गोवा आयडियल होते, पण खूप गर्दी असेल असे वाटते. मी सध्या कूर्ग आणि उदयपूर चा विचार करतोय.

पुष्कळ दूध शिल्लक आहे किंवा दिमाग का दही

लेखक दमामि यांनी गुरुवार, 28/09/2017 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय? पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय "मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन्  युक्तीचे सहा धडे कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले चहा पाजवा पुणेकरांना  सौराअभ्याने चिडविले दूध कुणाचे ,कपिलेचे की...?  कळ काढिती मुनीवर्य धसास नेती तोही मुद्दा अमुचे शहा

शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders. भाग II

लेखक प्रसाद भागवत यांनी गुरुवार, 28/09/2017 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
“मितरों…..” (ईतना सन्नाटा क्यों हो गया भाई??) शेअरबाजारांतील टीप्स, सल्ले यांतुन हमखास पैसा कमवायचे माझे एक 'टॉप सिक्रेट' (फक्त आपणालाच) सांगुन विषयावरील चर्वितचर्वण एकदाचे थांबविणार आहे. ऐकणार ना ?? मी यासाठी सर्वप्रथम बाजारांत नियमितपणे ट्रेडिंग करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे पत्ते, मोबाईल नंबर, ई-मेल आपणा सारख्यांच्याकडुन मिळवतो.

बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक

लेखक Anand More यांनी गुरुवार, 28/09/2017 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती.

योग- ध्यानासाठी सायकलिंग

लेखक मार्गी यांनी बुधवार, 27/09/2017 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/09/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो. पहिला प्रकल्प आहे तो तैवान बुलेट ट्रेनचा. तैवान हा एक छोटासा देश आहे. श्रीलंकेच्या बेटाची रुंदी जर कमी केली तर ते बेट जसं दिसेल साधारणपणे तसाच तैवानचा आकार आहे.

बार, कॉलेज गॅदरिंग आणि काळी पिवळीमध्ये वाजणाऱ्या गाण्यांचा बादशहा

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 27/09/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकारांची एक बिरादरी असते. सर्वसामान्य जनतेमध्ये ते किंवा पडद्यामागे काम करणारे असतील, तर त्यांचं काम तुफान म्हणावं इतकं लोकप्रिय असतं. पैसा आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असते. पण समाजातला 'उच्चभ्रू ' किंवा आपली अभिरूची हीच सर्वोत्तम आहे, असा गंड बाळगणारा अभिजन वर्ग या कलाकारांचं कुणी नाव घेतलं तरी नाक मुरडतो. समीर अंजान उर्फ शीतला पांडे हा असाच एक पडद्यामागचा कलाकार आहे. गीतकार या जमातीला अगोदरच आपल्याकडे प्रसिद्धी मिळत नाही. त्यातच 'मासेस'साठी काम करणाऱ्या कलाकारांवर तर अनेकदा वेगवेगळे ठप्पे मारून त्यांना अदखलपात्र ठरवण्याचं उद्योग नेहमीच चालू असतात. मागे एक किस्सा वाचनात आला होता.

आरसा

लेखक प्रावि यांनी बुधवार, 27/09/2017 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अजून किती दिवस आपण , असेच 'उपटत' बसणार ? कलियुगातल्या रामराज्याच्या 'अवताराची ' वाट ' बघतं बसणार ? कॉग्रेस गेलं , भाजप आलं , तरी 'गव्हर्नमेंट ' ला शिव्या द्यायची खोड जात नाय ..... अन आपलाच आरसा 'बघायची' सवय काय जडत नाय.... देशाची प्रगती -आपण नियम तोडूनही व्हायलाच पाहिजे , अन सकाळी कुठल्यातरी 'कोपऱ्यात 'जाऊन घाण केलीच पाहिजे .... दारू अन बाईच्या नादात -हाय नाय तो पैसा उडवायची हौस , अन दुसऱ्या दिवशी -सरकार आमच्या इकडं नाय पाऊस .....

हरिहरि...

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाचे वजन झाले मासातोळे कण्याचेही आता करतो वेटोळे व्हायचा गजर उंचावता हात कुठे गेली आता सगळ्यांची साथ केव्हाच फेकला भिकेचा कटोरा उरलासे आता फुकाचाच तोरा वाट जरा थोडी पाहिलेली बरी नाहीतर आता करू हरी हरी