Skip to main content

परबची अजब कहाणी---१

लेखक भागो यांनी गुरुवार, 18/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
परबची अजब कहाणी---१ बाबासाहेब सरपोतदार. बाबासाहेब सरपोतदार हे शहरातील नामी क्रिमिनल लॉयर. मोठमोठ्या खुन्यांना त्यांनी फाशी पासून वाचवले होते. तुम्हाला त्या नौदलाच्या अधिकाऱ्याची कथा माहित असेलच. ह्याने आपले सर्विस रिवाल्वर वापरून आपल्या बायकोच्या प्रियकराचा मुडदा पाडला होता. आणि कळस म्हणजे त्याने कोर्टात ह्या खुनाची कबुली अभिमानाने दिली. खरे तर त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेबांनी ह्या खुनाला खुबीने असे वळण दिले कि त्या खुन्याला त्यांनी हीरो बनवून टाकले. मग काय त्यावर नाटके लिहिली गेली. हिट सिनेमे झाले. असो. तर हा परब.

नोट

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 17/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नोट रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं . अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा ! हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच . किती आठवणी ... त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड . तिथे त्याला ती भेटली होती . तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत.

कृष्णाच्या गोष्टी-७

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 16/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
*स्यमंतक मणी रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.

गजेन्द्रमोक्ष

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 15/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
१. श्रीमद महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष नावाचे स्तोत्र आहे. लहानपणी ऐकले होते ह्या विषयी. पंचरत्न गीता की काय असे गीताप्रेस गोरखपुरचे पुस्तक होते. आजी वाचायची एकादशीला. मी कधी डिटेल मध्ये वाचलं नाही पण साधारण स्टोरीलाईन अशी आहे की - हत्ती जलामध्ये विहार करत असताना, एक मगर त्याला पकडतो, मग हत्ती श्रीविष्णुंची करुणा भाकतो.

श्रद्धांजली

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 14/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धांजली एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . रात्रीची वेळ. सगळीकडे शांत. असणारच ना .गाव छोटं होतं. मुख्य रस्त्यावरची दुकानं बंद झालेली. वर्दळ नाहीच . तशीही गावातली बरीचशी मंडळी शहराकडे. त्याच्या वयाची तर बहुतेक सारीच. काही अपवाद सोडता . एक छोटा चौक आला .छेदणारे दोन रस्ते म्हणून चौक म्हणायचं . चारी बाजूला सारं मोकळंच. माळरान नुसतं. कोपऱ्यावर चहाची एक टपरी. अर्थात तीही बंद झालेली. एकुलता एक लाईटचा खांब. अंधुक प्रकाश फेकणारा आणि त्या खांबाला लावलेला एक बॅनर . त्याच अंधुक प्रकाशात दिसणारा ... श्रद्धांजलीचा . त्यावर फोटो - एकनाथचा ... त्याचा शाळेतला खास मित्र.

मिपा कला संग्रहालय - ३ .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 14/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर हो ! मिपा कलादालन ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा सुरु करत आहे : .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण. ह्या धाग्यावर ऐतिहासिक व्यक्ती , किंवा प्रसंग ह्यांची चित्रे द्यावीत. प्रतिसादात हे टेम्प्लेट वापरल्यास सर्वांनाच सोयीचे होईल . प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव प्रतिसाद : चित्राचे नाव चित्रकाराचे नाव : इंटरनेटवरील लिंक पर्यायी लिंक: सर्व चित्रांची लिंक : चित्र : टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास.

विलक्षणाच्या उभ्या पिकावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 14/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
विलक्षणाच्या उभ्या पिकावर देण्या खडा पहारा पाहिजेत-जे भेदू शकतील स्थळकाळाची कारा पाहिजेत ते - नेणीव ज्यांची जाणिवेतुनी झरते अर्थगर्भ मौनातही ज्यांचे रोमरोम रुणझुणते पाहिजेत-जे उत्स्फूर्तीच्या पुष्करणीचे पाणी पिऊनी खोदतिल अमूर्तावरी अकल्पिताची लेणी पाहिजेत-जे अज्ञेयावर कलम करुनी ज्ञाताचे विलक्षणाचे वाण बनवुनी घेतील पीक उद्याचे

पवनाकांठचा धोंडी (ऐसी अक्षरे-१९)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 13/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
1 गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक! असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले! गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्य