मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विलक्षणाच्या उभ्या पिकावर

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
विलक्षणाच्या उभ्या पिकावर देण्या खडा पहारा पाहिजेत-जे भेदू शकतील स्थळकाळाची कारा पाहिजेत ते - नेणीव ज्यांची जाणिवेतुनी झरते अर्थगर्भ मौनातही ज्यांचे रोमरोम रुणझुणते पाहिजेत-जे उत्स्फूर्तीच्या पुष्करणीचे पाणी पिऊनी खोदतिल अमूर्तावरी अकल्पिताची लेणी पाहिजेत-जे अज्ञेयावर कलम करुनी ज्ञाताचे विलक्षणाचे वाण बनवुनी घेतील पीक उद्याचे

वाचने 1596 वाचनखूण प्रतिक्रिया 5

अथांग आकाश Sun, 07/14/2024 - 16:57
छान कविता! अनन्त्_यात्री तुम्हाला कवितेतलं काही कळंत नाही. शिकवणी लावा सर्वज्ञानी कॅटरपिलर कडे :)