दोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी
अमेरिकन हवाईदलातून निवृत्त होऊन लेफ्टनंट कर्नल चार्ल्स उर्फ चार्ली ब्राउन परिपूर्ण असे आयुष्य जगत होता. १९७२ साली अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातून निवृत्त झाल्यावर मायामी येथे स्थायिक झाला. १९८६ सालच्या एका कॉम्बॅट पायलट रीयुनियन सोहळ्यात त्याला वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्याला एकाने विचारले की "दुसर्या महायुद्धातील तुमचा सहभाग असलेल्या एखाद्या कामगिरीची आठवण सांगता का?" त्यावर त्याने 'ती' घटना सांगितली. ती घटना सांगितल्यावर चार्ल्स ब्राउनला वाटले की त्या घटनेतील एका व्यक्तीचा शोध घ्यायला हवा.दृकश्राव्य विभाग :- लेहची भटकंती
Roads were made for journeys not destinations' - Confucius
हे विचार ज्याला पटले तोच खरा प्रवासप्रेमी. या प्रवासाचं वेड फार वाईट. ते एकदा लागलं ना की मग तुम्हाला 'कुठच्या कुठे' आणि 'कुठे कुठे' घेऊन जाईल, तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही. असाच एक प्रवासप्रेमी मिपाकर अभिजीत अवलिया स्वतःची गाडी घेऊन, सहकुटुंब, पुणे - लेह - पुणे असा प्रचंड प्रवास करून आलाय.बकलावा
बकलावा नाव ऐकलं, तर सर्वसाधारणपणे काय येते डोळ्यासमोर? पण हे मध्यपूर्वेतील एका मिठाईचे नाव असून ती अतिशय स्वादिष्ट असते, हे समजल्यावर तिचा शोध घेणे क्रमप्राप्त होते.
बकलावा म्हणजे मध्यपूर्वेतील एक पक्वान्न. हा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. म्हणजे मूळ कृती एकच, पण आकार वेगवेगळे. बकलावा ज्याने एकदा खाल्ले त्याला वेड लावते, अशी माहिती मिळाली. एका मैत्रिणीने तुर्कस्थानातून आणलेला बकलावा खाल्ल्यावर याचे प्रत्यंतर आले.पिट्सबर्ग
अल्लेघेणी, मोनोन्गहेला आणि ओहिओ अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेले अमेरिकेतील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे पिट्सबर्ग. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या स्टीलशी संबंधित उद्योगधंद्यांमुळे पिट्सबर्गला 'स्टील सिटी' आणि शहरात असणाऱ्या तब्बल ४४६ पुलांमुळे 'सिटी ऑफ ब्रिजेस' अशी बिरुदावलीदेखील दिली गेलेली आहे. आज जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक गणले जाणारे पिट्सबर्ग दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मात्र एक अतिप्रदूषित शहर बनले होते. ह्याचे कारण म्हणजे युद्धकाळात वाढलेली स्टीलची गरज.सिनेमावाला विज्या
"विज्या, आज कॉप्या पुरवता नाही येत आपल्याले" मी धावतच सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या विज्याच्या गँगला सांगितले.
"कोण अडवते बे आमाले?” पोरे माझ्यावरच ओरडली.
"थांबा बे पोट्टेहो." विज्याच्या एका आवाजात पोरे चूप. त्याने त्याच्या बच्चन कट केसातून हात फिरविला, डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, विडीचा धूर सोडला आणि मला विचारले,
"पण काहून बे बारक्या?"
"मास्तर सांगत होता, आज इन्सपेक्टर येनार हाय."
"पोलीस" विज्या हलकेच हसला.
मिसळपाव