हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स !
नुकताच पावसाळा संपलेला असतो, सर्वांनाच उत्साहाचे टॉनिक पाजणारा दिवाळीचा मोठा सण ही झालेला असतो आणि अशातच एका प्रसन्न सकाळी अचानक गारवा जाणवु लागतो. ईतक्या दिवस न एकु येणारी कुठल्यातरी दुरवरच्या मंदिरातील काकड आरती आणि लांबवर धावणार्या रेल्वेची शिट्टी एकु येउ लागते. हळुवार थंडीची चाहुल लागते आणि जाणीव होते, आली एकदाची थंडी. मन प्रसन्न करणारा हा काळ. पावसाच्या रिपरिपीमुळे कंटाळलेले मन सुखावते. अगदी घरकोंबड्या मंडळींनाही उत्साहात मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर बाहेर काढणारा हा काळ. भरपुर सुकामेवा खाउन शरीराच्या बलाची वर्षभरासाठी बेगमी करायला लावणारा हा काळ. वर्षातले हे चार महिने मोठे प्रसन्न असतात.
मिसळपाव