Skip to main content

(हे कोहल्यांच्या विराटा)

लेखक दमामि यांनी शनिवार, 03/02/2018 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा शांत निवांत ग्राऊंड अस्ताला जाणारा धोनी येऊ घातलेल्या अनुष्काची पॅव्हेलियनमध्ये अस्पष्ट कुजबुज आताशा डोकं भडकत नाही आठवते अक्राळविक्राळ वादळ सहवागचं, धावा पिळवटून काढणारं उन्मळून टाकणारं सचिनचं अफाट दर्शन खरं काय म्हणावं मन रिझवणारं आयपीएल की मन उध्वस्त करणारं आयपीएल पैसेवाल्यांच्या या खेळाचा आयोजक कोण हे कोहल्यांच्या विराटा, भारताला जिंकून दे!
काव्यरस

डू-आयडीज् खूप दिसतात इथे, परतुनी येती "नाना"विध रूपे

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 03/02/2018 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
डू-आयडीज् खूप दिसतात इथे परतुनी येती "नाना"विध रूपे स्कोअर सेटल होतात इथे ट्रोलिंग जणू हक्कच असे कंपू करून पीडतात इथे पिंक टाकणे हेच ध्येय असे अजेंडा घेऊन येतात इथे काडी सारून नामानिराळे कसे विवादास्पद विषय प्रिय असे धागा पेटवून मजा बघती कसे अनेकानेक आयडीज् तयार असे एक उडाला तरी चिंता नसे मतामतांचा गलबला इथे मज जैसे सज्जन थोडेच असे

हे चैतन्याच्या विराटा

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 02/02/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
शांत निवांत समुद्र अस्ताला जाणारा नारायण येऊ घातलेल्या भरतीची लाटांशी अस्पष्ट कुजबुज आताशा भान हरपत नाही आठवते अक्राळविक्राळ वादळ सुरुची बाग पिळवटून काढणारं उन्मळून टाकणारं रौद्राच अफाट दर्शन खरं काय म्हणावं मन रिझवणारी संध्याकाळ की मन उध्वस्त करणारी कातरवेळ सुख दुःखाच्या या खेळाचा आयोजक कोण हे चैतन्याच्या विराटा, मला सामावून घे!!

वलय (कादंबरी) - प्रकरण ८

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 02/02/2018 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ७ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41877 --- प्रकरण ८: सोनीला तिसऱ्या दिवशी तिच्या रूमवरच्या इंटरकॉमवर हॉस्टेलच्या ऑफिसमधून फोन आला. "आपकी मदर आई है. ऑफिस में बैठी है!" "आई? आत्ता? अशी अचानक कशी आली?" असा विचार करत ती म्हणाली, "ठ ठीक है, भेज दो उनको अंदर!" "नही, वे अंदर नही आयेंगी. आपही को बाहर बुलाया है!" सोनी थोडी साशंक विचारांनी बाहेर जायला निघाली. “आई जवळ फोन आहे पण तिने फोन केला नाही. मला निघतांना किंवा पोचल्यावर कॉल केला नाही? काय झालं असेल?

बाजीराव अ‍ॅट बिठूर

लेखक मनो यांनी शुक्रवार, 02/02/2018 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी हे किस्से म्हणजे पुराव्यासकट सिद्ध करता येण्यासारखा इतिहास नव्हे. कुणी पाहिलेल्या, ऐकलेल्या, त्यात स्वतःची भर घालून सांगितलेल्या अश्या या दंतकथा आहेत. त्यामुळे त्यांना फार गंभीरपणे घेऊ नये अशी एक सूचना. यातले काही 'मंत्रावेगळा' कादंबरीकार ना. स. इनामदार यांनी लिहिले आहेत. काही विंचूरकरांच्या इतिहासात आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांत लढलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या चरित्रात काही सापडते. प्रतुलचंद्र गुप्ता या माणसाने दुसऱ्या बाजीरावावर ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार वाचून जे अनमोल संशोधन केले आहे त्यात काही सापडते.

राजस, सुकुमार, मदनाचा सुळका ( Madangad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 02/02/2018 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
मदनगड हा सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात छोटा किल्ला आहे. तसा हा किल्ला बराच प्राचीन आणि तेवढाच दुर्गमसुद्धा आहे. जगातला एकमेव "लँड ऑफ फोर्ट" असलेल्या महाराष्ट्रात सुमारे चारशे किल्ले आहेत. यात नैसर्गिक वरदान लाभलेल्या सह्याद्रीत बेलाग कड्यांची कवचकुंड्ल धारण केलेले अनेक गड आहेत. संपुर्ण भारत ईंग्रजांनी पादाक्रांत केल्यानंतर त्यांना खरा विरोध झाला, तो या महाराष्ट्र देशी. कातळांचे बेलाग कडे असलेल्या गड किल्ल्यांचा आश्रय घेउन मराठ्यांनी प्रखर प्रतिकार केला. अखेरीस इ.स.

Sheet Anchor of Indian Chronology

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 02/02/2018 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही.

!! एक स्वप्नपूर्ती !! झिरो बजेट नैसर्गिक शेती

लेखक अजित पाटील यांनी गुरुवार, 01/02/2018 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
तिन वर्षापूर्वी शेतीमध्ये नवीन काहीतरी सुरू करायच्या उद्देशाने शोध घ्यायला सुरुवात केली. इंटरनेट वर बरीच काही नवीन प्रोजेक्ट्स उपल्बध होते त्याचा अभ्यास सूरु झाला पण कोणाचा प्रोजेक्ट सध्याच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीला अनकुल असा मला तरी वाटत नव्हता, कारण आपला शेतकरी बांधव कर्जाच्या अजगराच्या विळख्यात अडकला आहे तो जितका त्यातून सुटण्याचा प्रयन्त करेल तितका जास्त त्याच्या घट्ट अश्या विळख्यात अडकत आहे असे मला वाटते पण याला काहीतरी उत्तर असेल का म्हणून माझी शोध माहीम सुरूच ठेवाली. एक दिवस इंटरनेट वर शून्य खर्चाची नैसर्गिक शेती बदल माहिती मिळाली .

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 01/02/2018 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

बजेट -- एवढं काय त्यात!!

लेखक चिनार यांनी गुरुवार, 01/02/2018 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आईची शप्पथ घेऊन सांगतो मला बजेट मधलं काहीही कळत नाही. पण आसपासचे लोकं "बजेट आहे,बजेट आहे" म्हणून अशी काही वातावरण निर्मिती करतात की मी उगाचच एक्ससाईट होऊन त्याची वाट बघायला लागतो. अर्थमंत्र्यांचं दोन- तीन तासांचं भाषण ऐकल्यावर "आपल्याला ह्यातलं काय कळलं?" असा प्रश्न एकांतात मी स्वत:ला नेहमीच विचारतो. आता हा प्रश्न क्षणिक असला तरी "आपल्याला नेमका काय फरक पडला?" हा प्रश्न तर वर्षभर सतावत असतो. बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टीत स्वस्त झाल्या असं जाहीर करतात. त्या खरंच झाल्यात का हे बघायला मी मुद्दामहून कधीही बाजारात जात नाही.