Skip to main content

मराठी दिन २०१८: मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

लेखक सूड यांनी सोमवार, 05/03/2018 11:26 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

इथे मिपावर मराठी भाषादिनानिमित्त लिहायचं निघालं आणि कधी नव्हे तो माझ्या मेंदूने बंद पुकारला. का विचारावं तर कारणं सतराशे साठ आहेत. पण याआधी असं कधी झालेलं आठवत नाही. आता पण लिहायला बसलोय खरा पण शेवट कसा होणाराय माहित नाही. त्यात इथे पुण्यात राहणं म्हणजे सगळीकडे एकतर साजूक तुपातलं शुद्ध पुणेरी मराठी किंवा मावळी बोली! अध्ये मध्ये काहीच नाही. इथे प्रत्यक्ष विचारल्याशिवाय फक्त लग्नपत्रिकेतल्या मुक्काम पोस्टावरून कळतं माणूस कुठल्या गावचा आहे. एरवी भाषा वर म्हटल्यासारखी दोन टोकाची.

मराठी दिन २०१८: समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी ! (दक्षिणी मराठी)

लेखक दक्षिणी मराठी यांनी सोमवार, 05/03/2018 09:43 या दिवशी प्रकाशित केले.

समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी !

आमचं ल्योंक आणि सूनाचं बरोर थोडं महिने राह्याकरतां आम्ही अमेरिकाला गेलोतों. तिकडं अधिकपक्षं दनांसीं न्यूस्-पेप्पर् घ्याचं दंडक नाहीं. समाचार अग्गीनं मोबैल-फोनांतं वाचूनचं कळींगतीलं. माझं ल्योंक पणीं तसंचं. पण, स्मार्ट-फोन् मण्जे मला होईना! पाष्टे फिल्टर्-काफी पिताना न्यूस्-पेप्पर् हातांत असामं असं दंडक होऊँगलं. पह्यिलं थोडकं दिवस तर्पडूँगलों आणि सोसाला होईनास्कं ल्योंकाकडं सांगिट्लों. "कां बाप्पा, कां मला तंम्हाच सांगट्ला नाहींतं? हे काय एवढं थोर विषय कां?

अन्नदाता सुखी भव भाग ८ (पूर्ण): तोतयांच्या शोधांत

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 05/03/2018 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

सल्ला हवा

लेखक शरद यांनी रविवार, 04/03/2018 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो ! तर काय सांगत होतो, मला आज एक सल्ला हवा आहे. मी येथे भरपूर लिहतो व ( पाककृती सोडून) वाचतोही. काही वेळेला वाटते की लेखकाने लिहलेले चुकीचे आहे. अनेकदा खात्री असते. कमी वेळी खात्री नसते.त्यावेळी मी गप्प बसतो व जाणत्यांनी लिहलेले शोधण्याचा प्रयत्न करतो. Quits. i पण ज्यावेळी माझी ठाम खात्री असते की लिहलेले चूक आहे त्यावेळी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. मला तीन मार्ग असतात. (1) विसरून जाणे.

Mp4 trek

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी रविवार, 04/03/2018 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
MP4 TREK माणिकपुंज - पिनाकेश्वर महादेव - पेडका - पाटणादेवी - पितळखोरे लेणी १. हनुमान मंदिरामागील पुष्करणी, माणिकपुंज पाटणादेवी-पितळखोरा ट्रेक करायचे ब-याच दिवसांपासून घाटत होते. २४ जानेवारीला ठाण्यातून निघेपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले. पुढे पावणेतीनशे किमीचा प्रवास होता. सियाझमध्ये पाच जण आणि डिकी सामान आणि पाण्यानी ठासून भरलेली होती.

मराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध

लेखक मनो यांनी रविवार, 04/03/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने. (टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ.

मराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी)

लेखक मित्रहो यांनी रविवार, 04/03/2018 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे. आता धावता ढोरामांग, समोर ढोर पिक खात हाय अस दिसत असूनबी रामाले घराकड पळा लागे. रामान लय उपाव करुन पायले पण काही उपेग झाला नाही.

अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत

लेखक जानु यांनी शनिवार, 03/03/2018 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या.

टी.सी.

लेखक तिमा यांनी शनिवार, 03/03/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
अपडाऊनच्या दिवसांतली गोष्ट आहे. मुंबईहून बोईसरला जाण्यासाठी त्यावेळी फक्त लांब पल्ल्याच्या गाड्याच उपलब्ध असत. त्यामधे रोज प्रवास करणार्‍या, माझ्यासारख्यांना, बसायला मिळणे मुष्किल असायचे. त्यावर पर्याय म्हणजे, विरारपर्यंत लोकलने जाऊन तिथून सुटणारी शटल सर्व्हिस पकडणे. आमच्यासारखे, वेळाचे फारसे बंधन नसलेले, हा पर्याय स्वीकारीत. हे शटल प्रकरण फार गंमतीदार होते. रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य झालेल्या जुन्या पुराण्या बोग्या, स्क्रॅप यार्डात पाठवण्याआधी, या शटल साठी वापरत. सहाजिकच मग, प्रथम वर्गातही सीटस्,पंखे,बर्थ, ट्रे, आरसे इत्यादि गोष्टी मोडकळीला आलेल्या असत.

कायद्याचा मार्च खोळंबणारा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 03/03/2018 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
कायदा बर्‍याच वेळा मदतीस येतो, तसा कधी असून नसल्यासारखा वावरतो. दोष राज्य कायद्याचे असण्याचा नाही तर त्यातील उणीवा वेळीच दुरुस्त्या न करणार्‍या आणि अंमलबजावणी न करणार्‍या माणसांचा असतो. आज ईशान्य राज्यातील इतर दोन राज्यांसोबत मेघालयाच्या विधानसभा निवडणूकीचेही निकाल आले. मेघालयात भाजपास दोनच जागांवर समाधान मानावे लागले तरी मतदानाची टक्केवारी नव्हत्यात जमा होती तिथून १० टक्क्या पर्यंत गेली. छोटे पक्ष साथ देतील त्यांचे सरकार येईल ते कदाचित काँग्रेसचे असेल किंवा लोकसभेचे माजी खासदार ख्रिस्तवासी पि. ए. संगमांच्या मुलांच्या पार्टीचे असेल.