Skip to main content

माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 11/03/2018 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ …. प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात. न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है ! कै. अविनाश चव्हाण, मंदार काळे, अशोक पाटील यांच्यासारख्या काही स्नेह्यांच्या संगतीमुळे मलाही हिंदी सिनेसृष्टीत दुर्लक्षीत राहिलेले चित्रपट शोधायची सवय लागलेली आहे.

मोदी सरकार केव्हा सुरु करणार प्रचार

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 11/03/2018 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीला एक वर्षे राहिलेय २०१३ ला जसा जोरात प्रचार केला होता ( निर्भया ,उत्तराखंड ) अजून कुठेच जोर नाहीये मित्र पक्ष दुरावलेत नोटबंदी gst उद्देश्य चांगला होता पण धंधे बंद पडलेत परिणाम अजून दिसले नाही मुख्य मंत्रांच्या विडिओ गाणे ,आपल्याच सरकारचा चिक्की घोटाळा अर्थ संकल्प पण काही जोर नाही पुण्यात काँग्रेस ने निवडणुकी साठी फ्लेक्स बाजी सुरु केली आहे कुठे नेऊन ठेवलाय चाणक्य माझा

अन्नपुर्णा आणि अण्णा

लेखक शाली यांनी शनिवार, 10/03/2018 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
साल आठवत नाही. कॉलेजचे दिवस होते ईतकं सांगीतलं तरी पुरेसं होईल. 'ईंजीनिअर’ केलं की पोराचं आयुष्य मार्गी लागतं, आणि बोर्डींगला किंवा होस्टेलला पोरगं ठेवलं की त्याला शिस्त लागते असं आई-बापांना वाटायचा काळ होता तो. आई-बापही भाबडे होते त्या काळी. त्या मुळे आमची रवानगी सहाजीकच ईंजीनिअरींगला आणि बाड-बिस्तरा होस्टेलला जाऊन पडला. गाव, शाळा सुटलेली. शहर, कॉलेजची ओळख नाही. त्या मुळे सुरवातीच्या दिवसात कॉलेजच्या आवारात आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या अनोळखी रस्त्यांवरुन 'मोरोबा’सारखा चेहऱा करुन निरर्थक भटकायचो. मोरोबा म्हणजे आमचा घरगडी. निव्वळ शुंभ.

उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 09/03/2018 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडरचे दुसरे पान उलटले जाते आणि मार्च महिना सुरु होतो. सुखद थंडी हळूहळू नाहीशी होते आणि उकडायला सुरु होते. उन्हाळ्याची चाहुल लागते आणि ट्रेक करायचे कि नाही हा प्रश्न पडू लागतो. खरंतर उन्हाळा हा ऋतु एकुणच ट्रेकींगसाठी प्रतिकुल म्हणायला हवा. एकतर भाजून काढणारे उन, कळाकळा तापलेली धरती, पटकन येणारा थकवा, शरीरात झपाट्याने कमी होणारे पाण्याचे प्रमाण, गडावर उपलब्ध पाण्याची परिस्थिती ह्या सर्व बाबीचा विचार केल्यास एकुणच उन्हाळी भटकंतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. पण सह्याद्रीने या ऋतुसाठीही काहीतरी स्पेशल ठेवले आहे.

एक पुस्तक परिचय. The Noticer. लेखक Andy Andrews.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 09/03/2018 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक पुस्तक परिचय. The Noticer . लेखक . Andy Andrews. प्रकाशन संस्था .Thomas Nelson .Inc. मला आवडले तुम्हाला आवडते का बघा ? वाचनाची आवड उपजत असते की ती आपणच निर्माण करून वाढवावी लागते कुणास ठाऊक ? पण मला आवड आहे वाचनाची आणि मला आवडलेली पुस्तके लोकांनी सुध्दा वाचावी असे मला वाटते. म्हणून हा लेख आणि कदाचित या पुढचेही .कारण मला रामदासांचे वचन आवडते “ जे जे आपणास आवडे ते ते लोकांस सांगावे शहाणे करून सोडावे सकाळ जन !” Andy Andrews हे एक लोकप्रिय लेखक. व्यक्तिमत्व विकास हा त्यांचा खास विषय . The Noticer हे त्यांचे माझे विशेष आवडीचे पुस्तक . विषय अगदी सोपा आणि साधा .

वलय - प्रकरण ३४ ते ५२ (समाप्त)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 09/03/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण २९ ते ३३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42181 प्रकरण 34 शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा! थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता.

३५ रियाल

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 09/03/2018 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला. दुपारच्या टळटळीत उन्हात रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं.... मागे पडण्याऱ्या दुतर्फा खजुराच्या झाडांबरोबर त्याचे विचारही पळू लागले. ‘..... काये त्याला अक्कल? मी आलो आणि लेबर प्रॉब्लेम मिटवला. कामं मार्गी लागली. मी कागदावर काय आहे, काय नाही, ते जाऊ दे यांच्या उंटाच्या ***. पण प्रोजेक्ट मार्गी लागला ना!

सामाजिक उपक्रम -२०१८

लेखक निशदे यांनी शुक्रवार, 09/03/2018 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही.

आठवण

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 08/03/2018 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरसरत्या सरिनी तुझी आठवण यावी रिमझिम पावसात माझ्या सवे तू भिजावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी कधी उगवतो दिस तोहि मावळू पाहतो तुला कुशीत ग घेण्या जिव कासाविस होतो झालो मायेला पारखा तुझ्या माझ्या विरहाने दोन शब्दाच्या प्रेमाला आत्ता किती ग बहाने कधी डोळे मिटताहि स्वप्ने तुझीच का यावी किलबीलती पहांट तुझ्या सवेच दिसावी आता ओढ़ या मनाची कशी कुणाला कळावी राती चांदण्या साथीने माझ्या अंगनी तू यावी
काव्यरस