Skip to main content

कोवळे काही ऋतू...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 26/03/2018 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले... मोहराने रान सारे बावरुन गेले! लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या? गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

लेखक खिलजि यांनी सोमवार, 26/03/2018 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी निर्व्यसनी असाल तर वाईट सवय लावून घ्यावी व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा लिटमस पेपरवरी जर सामू आला सात लग्नास नसावी काही बात त्यामध्ये असेल चढउतार घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातूनी सवयीनुसार सामूची वर्गवारी तंबाखू असे तीनवरी सुपारीसहित तोच बैसे पाचावरी सोडामिश्रित आठवरी तर ऑन दि रॉक्स ती दहावरी देशीसाठी नसे चाचणी देशी असे जनावरी लक्षात ठेवा नवरोबानो अर्धांगिनी पण लिटमस परी सुटणार नाहीत नाद कुणाचे असाल कायम रडारवरी व्यर्थ नका मरू दादा घ्या लिटमस पेपर साधा व्यसनांती पण सामू जर "सात " असेल तरच निवडा आपली राधा

सध्या कुठले पुस्तक वाचत आहात?

लेखक बार्नी यांनी सोमवार, 26/03/2018 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या वाचत असलेली पुस्तके 1)Why Nations Fail: The Origins of Power, Prosperity and Poverty जगात आर्थिक विषमता का आहे? काही राष्ट्रे अत्यंत सुखी तर कांही राष्ट्रे गरीब का राहिली? इ. प्रश्नांचा मागोवा घेणारे हे भन्नाट व सखोल पुस्तक .

बस्तर दशेरा – एक अद्वितीय लोकोत्सव

लेखक विहंग३००७ यांनी रविवार, 25/03/2018 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
अनवट निसर्गासोबत लोकजीवन नाही अनुभवले तर बस्तरची सहल अपूर्णच! त्यात दसऱ्याच्या सुमारास तुम्ही बस्तरमधे असाल तर दुधात साखर. बस्तरमधे साजरा केला जाणारा दसरा (बस्तर दशेरा) म्हणजे एक एकमेवाद्वितीय लोकोत्सव आहे. भारतात सर्वत्र दसऱ्याच्या उत्सवाला रामायणाचा संदर्भ आहे. रामाने रावणावर मिळवलेला विजय, सीतेची बंधनातून केलेली मुक्ती, आणि थोडक्यात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. बस्तर दशेरा मात्र संपूर्ण वेगळा आहे. रामाने वनवासातली दहा वर्षे दंडकारण्यात, म्हणजेच आजच्या बस्तरमधल्या रानात, व्यतित केली असली तरी इथल्या दसऱ्याच्या उत्सवाचा रामायणाशी काहीच संबंध नाही.

भटकन्ती -१०

लेखक इन्ना यांनी रविवार, 25/03/2018 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
भटकन्ती १० भटकेपणा बर्‍याच प्रकाराचा असतो. प्रत्यक्ष पायपीट हा मनापासून आवडणारा प्रकार असला तरी मनातल्या आठवणींबरोबर केलेली भटकंती त्याहून मनाजवळची अन हृद्य! अश्या बर्‍याच जागा आहेत जिथे फक्त मनातच जाता येतं. माझं लहानपणीचं घर. वर्तमानात जिथे आता एक अपार्ट्मेंट उभं आहे. तोक्यामधलं एक सुंदर तळं, त्यात पानगळीच्या सुंदर रंगांचं प्रतिबिंब पाहता पाहता मला मनाचा तळ दिसला होता. लहानपणीचे आजोळचे घर, लहानपणीचीच पर्वती! आठवणीतली सफर. smile हे भटकणं म्हणजे फक्त ती निव्वळ जागा नसून, जागा, माणसं, आवाज, खादाडी, गंध ह्या सगळ्यांच्या आठवणींचं मस्त मिश्रण असतं!

टिपू आणि अकबर

लेखक माहितगार यांनी शनिवार, 24/03/2018 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्विकार्यता, आणि स्विकार्यतेसाठी लेजिटीमसी/योग्यतेचे चित्र उभे करणे ही सर्वकालीन राज्यकर्त्यांची गरज असते म्ग काळ कोणताही असो, अकबराचा , टिपूचा , ब्रिटीशांचा ,महात्मा गांधीचा , की आता मोदी आणि राहुल गांधीचा . जयंती कुणाचीही साजरी करता येते. - आपली संस्कृती उदार आहे, विघ्नकर्त्यांच्या पुजेसही मान्यता देते - आपण कुणाच्या जयंत्या साजर्‍या करत आहोत त्या बद्दल इतरांना काही प्रश्नचिन्हे आहेत का या बद्दल सोईस्कर दुर्लक्ष करता येते (किंवा संशयही निर्माण करता येतात) किंवा झाकपाक करता येते पण झाकलेली प्रश्नचिन्हे परत फिरुन येणारच नाहीत असे ही नसावे.

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/03/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप). आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही.