फसता फसता जमलेली गोष्ट
मी शक्यतो मंगळवारी कोणतही महत्वाचे काम करत नाही. काही तरी सुचलेलं लिहूण काढणे किंवा फुटपाथवरील पुस्तकांची, रद्दीची, एमपी3ची दुकाने धुंडाळणे, जुन्या बाजारात भटकणे किंवा एखाद्या मित्राला सरप्राईज व्हिजीट देणे याच भानगडीत दिवस जातो. बऱ्याच जणांना वरिलपैकी एकही गोष्ट आवडत नाही. पण माझ्याकडे असलेल्या अनेक दुर्मीळ गोष्टी याच सवयीतुन मला मिळाल्यात. या मंगळवारी मी अति ऊन्हामुळे बाहेर जायचे टाळले होते. घरीच पुस्तके विषयवार लाव, लॅपटॉपची सफाई, बॅकप घे, पुस्तके विषयवार लाव यात गुंतलो होतो. इतक्यात बेल वाजली. मी डोअर आय मधुन पाहीले तर मित्र हात हलवत होता. आता हे साहेब कशाला आले? असं वाटलं.
मी स्वप्न पाहत नाही
मी स्वप्न पाहत नाही
कारण , मला ते पडत नाही
नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे
काहीतरी वेगळंच बनायचे
मी पडतो , लकटतो त्या पलंगावर
विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे
डोळे काही मिटत नसतात
स्वप्न कुठले बघायचे नि कसे ?
याचेच विचार मनात घोळत असतात
हळूहळू झापड यायला लागते
डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते
मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही
डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून
पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो
काही स्वप्न पडलं का ?
असं वाटतं !
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं...............
निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................
काव्यरस
ऑक्टोबर
आयुष्याच्या महत्वाच्या गरजा भागलेली आजची तरुणाई. कुठच्यातरी भयंकर अडचणींमधून मार्ग काढून काहीतरी नेत्रदीपक करण्याची निकड संपलेली. जगण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोय, हे कळण्याइतका विचार करण्याची सवय नाही, आणि तरी त्या प्रश्नाच्या गर्तेत कधी ना कधी अडकून भरकटणारी, त्या डोळ्यांत भरणाऱ्या भरकटलेपणावर आपापल्या कुवतीने उत्तरं शोधणाऱ्या, सुचवणाऱ्या जगावर कावलेली तरुणाई.
ऑक्टोबरमधला डॅन म्हणून सहजपणे आपला वाटू शकतो. व्यवहारात मंद, आणि तरी काहीतरी करण्याची इच्छा असणारा, ते करण्यासाठी मार्ग माहीत नसलेला, आणि मग ती काही करण्यासाठीची ऊर्जा उगाच जगाला हडतुड करत वाया घालवणारा डॅन.
मिसळपाव