न्युयॉर्कराज्यातील एक भटकंती : वॉटकिन ग्लेन्स स्टेट पार्क - गॉर्ज ट्रेल
नुकतेच केलेल्या एका ट्रिप मध्ये Watkins Glen State Park मध्ये जाण्याचा योग आला. हे पार्क न्युयॉर्क राज्यातील फिंगर लेक्स च्या भागात येत. फिंगर लेक्स हा पाच सहा अत्यंत निमुळत्या लांबलचक तलावांचा प्रभाग आहे. अतिषय सुंदर , घनदाट झाडीने भरलेला प्रदेश त्यात ही आपण लहान्पणी चित्रात ज्या निळ्यारंगाने नदी /तलाव रंगवायचो तितक्या नितळ निळ्या रंगाचे लेक्स . अतिषय सुंदर क्लायमेट असल्याने भरभराटीला आलेल्या वाईनरीज .
त्यामध्ये असणार्या सर्वात मोठ्ठ्या सिनेका लेक जवळील वॉटकिन ग्लेन्स हे नॅशनल पार्क ! ह्या इथे इंडियन ट्रेल आणि गोर्ज ट्रेल असे दोन अत्यंत सोपे ट्रेल्स आहेत .
मिसळपाव