Skip to main content

तो आणि ती.... राधा! (भाग 4)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/07/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती................ राधा "राधे...... तू आणि इथे द्वारकेत?" "तुला देखील वाटलं नाही ना की मी इथवरचा पल्ला गाठेन? त्या स्वप्नवत नंदनवनातील सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून केवळ तुझ्या शेवटच्या.......दर्शनासाठी मी द्वारकेचा दरवाजा वाजवेन?" "शेवटच्या?

रानभाजी - पेव च्या पानांची भजी

लेखक जागु यांनी बुधवार, 11/07/2018 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात.पेवचे कंद असतात. त्याला कालांतराने सुंदर पांढरी फुले येतात.

प्रॉन्स पफ

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 11/07/2018 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रॉन्स पफ . कोलंबी पुराणातला आणखी एक अध्याय.माझ्या आईची पाककृती.

गुगल फोटोज अथवा ब्लॅागर यांवरून फोटोची इमेज लिंक कशी मिळवावी

लेखक कंजूस यांनी बुधवार, 11/07/2018 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
गुगल फोटो / ब्लॅागर यावरून फोटोशेअरिंग अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहित आहे. गाभा : गुगल दिवसेंदिवस सर्वव्यापी होत आहे तसेच त्यांच्याकडूनही सतत बदल होत आहेत. पिकासा - गुगुल प्लस - गुगल फोटोज असे बदल झाले आहेत. सध्या वेबसाइटवर फोटो देण्यासाठी या दोन साइट्स कशा वापरायच्या ते पाहू . गुणदोष अथवा अडचणींचाही विचार करूया. मोबाइलमध्ये कॅम्रे चांगले आले ,ते सतत बरोबर असतात त्यामुळे त्यातूनच फोटो काढून फेसबुक अथवा इन्स्टाग्राम तसेच वाटसप माध्यमातून इतर लोकांना दाखवता येतात.

शिवबा आमचा मल्हारी!

लेखक सई जोशी यांनी मंगळवार, 10/07/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार दुपारची वेळ, साधारण १:३० वाजलेले. सहकुटुंब मराठी picture ला जायचा योग तसा कमीच येतो आमचा, पण ह्यावेळी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरचा picture असल्यामुळे एकत्र बघायचा असे ठरवलेच होते, picture अर्थातच "फर्जंद". तर theater मध्ये पोचलो आणि अजिबात गर्दी दिसेना. जरा वाईटच वाटलं मला. काही दिवसांपूर्वीच "Jurassic World" बघायला गेलो असताना "संजू" साठी १ km लांब असलेली रांग बघितली होती. संजय दत्तवरचा picture बघायला लोकं इतकी गर्दी करतात आणि मावळ्यांवरच्या picture ला नाही ह्याचं वाईट वाटलं बहुदा मला.

वार्‍याची डरकाळी !

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी मंगळवार, 10/07/2018 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉलेजमध्ये असतानाची आठवण. आमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता. आमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं. जवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं!

कथा तिसरी - शहज़ादी....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/07/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...." दुसरी कथा - गुलबानो

शहजादी

मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता.

डाळ गंडोरी

लेखक shital यांनी मंगळवार, 10/07/2018 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: १ वाटी तूरडाळ १ मोठी पेंडी(जुडी) आंबटचुका किंवा अंबाडी १-२ हिरवे टोमॅटो १/२ पेंडी (जुडी) पालक ५-६ हिरव्या मिरच्या ३-४ मोठ्या पाकळ्या लसूण १ पेरभर लांबीचा आल्याचा तुकडा साहित्य ब) ५-६ लांब हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ ५-६ लसूण पाकळ्या पेरभर आल्याचा तुकडा १/२ ते १ वाटी शेंगदाणे १/२ वाटी खोबर्या चे काप साधारण ४-५ टेबल्स्पून तेल क्रमवार पाककृती: साहित्य अ) मधल्या पालेभाज्या निवडून घ्यायच्या. अंबाडीची भाजी घेणार असाल तर फक्त पाने वापरायची. लसूण, आले ओबडधोबड ठेचुन घ्यायचे. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे. भाज्या धुवुन घ्यायच्या.

कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रा.

लेखक खुशि यांनी सोमवार, 09/07/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
।। कवठगुलंद चे गुरुतुल्य नाना ॥ नाना - किर्तनकलाशेखर,किर्तनाचार्य,किर्तनचुडामणी,किर्तनकौस्तुभ,किर्तनभूषण, किर्तनगानकौस्तुभ,किर्तन कलासागरअशा महाराष्ट,मध्यप्रदेश सरकारने दिलेल्या पदव्यांनी विभूषित रेडिओस्टार ह.भ.प.श्री.नारायण श्रीपाद काणे या गुरुतुल्य ऐंशीवर्षांच्या तरूण उत्साही व्यक्तिमत्वाची ओळख,परिचय आणि सहवास या कवठेगुलंद ते शिवपुरी अक्कलकोट पदयात्रेत मला मिळाला ही मैया आणि मोरयाची क्रृपा.नर्मदे हर. नानांच्या घराण्यात पांच पिढ्यांची किर्तन परंपरा आहे भीमसेन जोशीजीं सारख्या गोड पहाडी आवाजाची ईश्वरी देण

आपल्याच तिरडीसाठी आपणच पैसे द्यायचं

लेखक खिलजि यांनी सोमवार, 09/07/2018 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
कॅन्सर हा आता ग्रँड रोग झाला साल मरणाला पण सोन्याचा भाव आला बळीराजाला दाखवून अमिष कंपन्या पेरतायत शेतामध्ये विष औषधे तत्पर सेवेस रुग्णांसाठी थोडे पुढं ढकलण्यासाठी दिवस एकास होतो खरा पण जुंपले जाते सारे कुटुंब कुणी विकतात शेतीवाडी तर गिधाडांचे खिसे तुडुंब आलो इथवर विज्ञान घेऊनि जुने दिले केव्हाच टाकून तेच सोने होते, माझ्या बाळा ताजे खायचा अन शिळे द्यायचा फेकून सरकार असो कुठलंही कर मात्र नेमाने घेतात कायद्याच्या नावाने बोंब सारी येनकेन प्रकारे फक्त बळी जातात कुठे दडली मेख सारी भलतीकडेच सुरु इलाज त्याचा बळीराजाचा खांदा वापरून सरकार प्रजेवरच नेम धरी तर म