Skip to main content

डाटा रिकव्हरी

लेखक _मनश्री_ यांनी सोमवार, 20/08/2018 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते

दाभोळकरांना श्रद्धांजली (आज पाच वर्ष झाली)

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 20/08/2018 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
साधना नराधम वार करी नरोत्तम 'देवा' घरी आता तो नाही उरी ही अंधश्रध्दा ! शोषीत न रहावं भोळं म्हणून कोणी कर दाभोळ झेली आगीचा लोळ न हो व्यर्थ. पुन्हा येतील कुंभमेळे रंगती स्नानाचे खेळे मात्र नाही या वेळे तो साधक. (लिहीली या दिवशी 25/08/2013)

पूर्णब्रह्माचा अपमान!!

लेखक आनन्दा यांनी रविवार, 19/08/2018 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

अज्ञाताचा गड चढताना

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 19/08/2018 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले
काव्यरस

गावाकडची गोष्ट

लेखक दिनु गवळी यांनी शनिवार, 18/08/2018 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अरे .. ! ये दिनू अरे थांब कि थोडा वेळ मला पण यायचं आहे . तू असा एकटाच कसा चालला पण दिनू च लक्ष आज कुणाकडेच नव्हतं त्याला आज काहीही करून त्या गावाबाहेरच्या पडक्या विहिरीचं रहस्य शोधायचं होत मागील एक महिन्या पासून त्या विहिरीजवळ मेलेली मांजर दररोज टाकलेली असायची .

आभाळ

लेखक शब्दवेडी यांनी शनिवार, 18/08/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याविना घर खायला उठतं मला. तू असताना जांभळीच्या पांनातून येणारं वारं सोबत शहारे घेऊन येतं आणि तू नसताना, मनाला कापरं भरवतं. तू नसल्याच्या जाणीवेनी माझा भूप भैरवी बनतो आणि मागे उरतात फक्त काही आर्त स्वर – काळीज चिरत जाणारे. तुला कितपत कळेल माझी भाषा, माझी आर्तता, माझ्या भावना, नाही माहिती मला. तरीपण तुला सांगावासं वाटतं, तू माझा आधार आहेस. माझं आभाळ आहेस. म्हणशील मला तू खुळचट आणि विचारशील “अगं वेडे, आभाळ कधी आधार देऊ शकतं का?” इतरांना नाही देऊ शकणार कदाचित पण तू आहेस माझं आभाळ आणि आधारपण! लोकांना जगण्यासाठी डोक्यावरती छप्पर लागतं, एक निवारा लागतो, चार भिंती लागतात.

आमचे अण्णा!-१

लेखक VINOD J. BEDGE यांनी शनिवार, 18/08/2018 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अण्णा!-१ आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा एक अतरंगी व्यक्तिमत्व,एकदम दिलखुलास. सात बहिणींच्या नंतर झाले असल्याने पणजोबांनी लाडावून ठेवलेले त्यामुळे सगळे रंगढंग,मजामस्ती आणि काय काय असतील ते सगळे अनुभव गाठीला असलेले. तसं आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं आता दुष्काळी पण आजोबांच्या वेळी पाऊसपाणी चांगल असलेलं त्यामुळे हळद ,पानाच मळा, ज्वारी,असं सधन आणि चार पैसे राखून असलेले लोक, एकंदर सुखी म्हणावं असं गाव. तर असे हे एकुलते चिरंजीव आणि त्यांचे एक आप्पा नावाचे मित्र फुल धिंगाणा करायचे.

पावसाचं गीत

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 18/08/2018 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या रानात पाखरांची वस्ती पावसाचं गीत कंठातून गाती नभात उतरले रंग सावळे मेघात लपले आभाळ निळे पसरला माथ्यावर ढगांचा मांडव पिसाट झाडांवरती विजांचे तांडव शिवारात सरकते वाऱ्याची लाट माती पाहते पाऊसओली वाट

भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)

लेखक गणेश विजय काळे यांनी शुक्रवार, 17/08/2018 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
भद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया….. ११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली.

पावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/08/2018 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
एतिहासिक कागदपत्रे वाचताना खुप काळजी घ्यावी लागते, कारण जसा मराठीमधे श्लेष अलंकार आहे, ज्यामधे एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतात, तसेच मोडी लिपीच्या लिहीण्याच्या सलगतेमुळे कदाचित चुकीचा निष्कर्श निघू शकतो. नेमकी अशीच एक घटना वर्धनगड किल्ल्याबाबत झाली असावी. जेधे शकावली या शिवचरित्राच्या दृष्टीने महत्वाच्या आणि अस्सल साधनामधे एक उल्लेख आहे, "राजश्रीवर्धनगडास जाउन संपुर्ण उष्माकाल राहिले". १२ आक्टोंबर ते नोव्हेंबर १६६१ असे महिनाभर शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. पण नेमक्या कोणत्या गडावर असा प्रश्न महत्वाचा आहे.