Skip to main content

सेक्रेड गेम्स: ठो-कळे

लेखक वनफॉरटॅन यांनी सोमवार, 03/09/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं. (पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.) नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स ही आजकाल अतिशय चर्चेत असलेली भारतीय मालिका. मालिका त्रैभाषिक आहे. मुख्य पात्रांतले संवाद हिंदी/इंग्रजीत असले तरीही कथा मुंबई पोलिसांभोवती फिरणारी असल्यामुळे मराठीचा वापर इंग्रजीपेक्षा जास्त आहे.

फ्लुओराइड : दातांचे अंगरक्षक

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 03/09/2018 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
(खनिजांचा खजिना : लेखांक ५ ) सूक्ष्म पोषण घटकांपैकी दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले हे खनिज. विविध प्रसारमाध्यमांतून आपल्यासमोर फ्लुओराइडयुक्त टूथपेस्टच्या जाहिराती सतत आदळत असतात. त्यातून आपल्याला फ्लुओराइडच्या महत्वाची जाणीव होत असते. निसर्गात ते माती, विशिष्ट खडक आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांत आढळते. अल्प प्रमाणात ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण, ते अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास मात्र तापदायक ठरते. त्याचा सर्वांगीण आढावा या लेखात घेतला आहे. आहारातील स्त्रोत १.

बाह्य बळाने ढकलल्यावर विरोध करणारी व पुन्हा सावरणारी बळे (Restoring and Opposing forces)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 02/09/2018 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
परकीय आक्रमण झालं की त्याला थोपवायला आपलं सैन्य सरसावते, युद्धामध्ये खासकरून सशस्त्र युद्धामध्ये जशास तसं वागावंच लागतं. माणसाला रोग झाला तर त्याचं शरीर व विशेषत: पांढऱ्या रक्तपेशी त्या रोगाशी लढा देऊन पूर्व स्थितीवर येण्याचा प्रयत्न करतात. चांगलं तापलेलं पाणी पुन्हा काही वेळानं थंड होतं. संकटात सापडलेला माणूस आपत्काळात वेगळा वागतो आणि संकट टळलं की पुन्हा आलाच मूळ पदावर. 'पहिले पाढे पंचावन्न ', 'स्वभावाला औषध नसते', 'सूंभ जळला तरीही पीळ जळत नाही' अशा म्हणी उगीच आल्या नसतील. "विक्रमा काय रे हे ? मानवी स्वभाव वगैरे चा विचार करतोयस.. पदार्थ विज्ञान सोडून मानस शास्त्राचा विचार करतोयस आज ?

वॉल्डन...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 02/09/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
- नुकतेच हेन्री डेव्हिड थोरोच्या वॉल्डन या पुस्तकाचा अनुवाद व त्याचे चरित्र लिहून संपवले... बरेच दिवस लिहित होतो. भाषा जुन्या वळणाची असल्यामुळे कळण्यास अवघड वाटली पण या अनुवादाच्या प्रवासात बरेच विचार मंथन घडले. काही गोष्टी पटल्या तर काही नाही. ज्या पटल्या नाहीत त्याचा आता हल्लीच्या युगात काही संदर्भ राहिला नसल्यामुळे. पण ज्या पटल्या त्या मात्र कायमच्या उपयोगी पडणार्‍या आहेत हे निश्चित... असो. त्यातील काही परिच्छेद येथे टाकत आहे.... मी झपाटल्यासारखे ही सगळी पाने लिहिली त्यामुळे प्रकाशक मिळेल का इ इ. विचारच केला नाही.. :-) बघूया आता... मिळाला तर बरे...

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 02/09/2018 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं! पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं! स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं! माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं! तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं... अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं! वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार! नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं! - कुमार जावडेकर
काव्यरस

सामानाची यादी

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 01/09/2018 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
सामानाची यादी आज मुलीने पुढाकार घेऊन बाजारातून आणावयाची सामानाची यादी दिली. पूर्वी आई द्यायची तशी. फरक इतकाच की आई मराठीतूंन यादी देत असे मुलगी इंग्रजीतूंन लिस्ट देते. दोन्ही याद्या जोडणारा कॉमन दुवा म्हणजे मी. नातीने आजीचे सुवाच्च अक्षर हुबेहुब उचलले आहे. मधले बापाचे आणि आजोबाचे गलिच्छ अक्षर बायपास करून. यादीत बऱ्याच गोष्टी आहेत त्याला आठवणी आहेत. प्रत्येक जिन्नासाला आठवण वेगळी. मटर म्हटले की एकत्र मटर शेंगा सोलणारे गोलाकार आमच्ये एकत्र कुटुंब डोळ्या समोर उभे रहाते. आई असते, बाबा असतात, पूर्वा असते मी असतो. जो जास्त शेंगा सोलेल त्याला जास्त उसळ मिळेल अशी गमतीची चढाओढ असायची.

गूढ अंधारातील जग -१०

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 01/09/2018 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -१० खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र --Diving medicine, also called undersea and hyperbaric medicine रोजचे वैद्यक शास्त्र हे शरीरावर हवेचा दाब १ atm (म्हणजे समुद्र सपाटीवर असलेला हवेचा दाब) याला शरीर कसे प्रतिसाद देते त्यावर अवलंबून असते. पण खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र म्हणजे पाण्याच्या दाबामुळे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय/ उपचार असे आहे. पाणबुडीला जर अपघात झाला तर आतील सैनिकांना सुरक्षित बाहेर काढताना ती कोणत्या खोलीवर आहे हे महत्त्वाचे ठरते.

भारतातील भाषासमृध्दी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/09/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार भाषिक आकडेवारी तब्बल सात वर्षांनी म्हणजे आत्ताच जून 2018 च्या शेवटी प्रकाशित करण्यात आली. भारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा 19,569 असल्याचं उघड झालं. (आताचे भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते.) भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपावणारीच बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी.

चालू घडामोडी - सप्टेंबर 2018

लेखक ट्रम्प यांनी शनिवार, 01/09/2018 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे . नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे . रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु. परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15.