दोसतार- १६
मागील दुवा दोसतार १५ - https://www.misalpav.com/node/43124
वर्गात कवितेचा उत्सव सुरू होता. वर्गा बाहेरून त्यावेळे कोणी गेले असते तर त्याला एकाच वेळेस दहा बारा रेडीओ ऐकतोय असे वाटले असते. शाळा सुटल्याची घंटाही आम्हाला कुणालाच ऐकू आली नाही आणि त्या अगोदर झालेले" अभ्यासाची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत " हे प्रकटनही ऐकू आले नाही.आम्ही कविता म्हणतच राहिलो. आख्ख्या शाळेच्या इतिहासात झाले नसेल आज प्रथमच कोणालाच घरी जायची घाई नव्हती. तास असाच अजून चालूच रहावा , शाळा उगाच लवकर सुटली.एकदाची पुस्तके आले.
मिसळपाव