देवगिरी किल्ला
देवगिरी किल्ला
औरंगाबादपासून जवळच असलेला देवगिरी उर्फ दौलताबादचा किल्ला म्हणजे
महाराष्ट्राच्या शिवपूर्वकालीन दैदीप्यमान इतिहासाचा चालता बोलता साक्षीदारच. हा किल्ला स्थापत्य शास्त्राची एक अजोड अशी कलाकृती म्हणूनही ओळखला जातो. शिवछत्रपतींनी सतराव्या शतकात स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सुमारे पाचशे वर्ष आधी ( बाराव्या शतकाच्या अखेर ते चौदाव्या शतकाच्या आरंभी दशकापर्यन्त) देवगिरीच्या यादवांचे स्वकीय हिंदू साम्राज्य होते. हा देवगिरी साम्राज्याचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक सोनेरी पान म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
मिसळपाव