Skip to main content

मोहाचा विळखा -भाग २/३

लेखक असहकार यांनी मंगळवार, 22/01/2019 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात आपण पाहिले की पॉन्झी स्किम कशा आकाराला येतात व कशा नष्ट होतात. सोबत नष्ट होतात अनेक आयुष्ये, स्वप्ने आणि खूपसारा कष्टाचा, घामाचा पैसा. चला, पैसा तर पुन्हा कमावल्या जाऊ शकतो पण विश्वासाला जो जबरदस्त तडा जातो तो आयुष्यभर भरुन येत नाही. अशी माणसे मग पुढे कोणताही व्यवहार करतांना साशंक राहतात, किंवा व्यवहार करतच नाहीत. त्यांची आर्थिक प्रगती खुंटते. या भागात आपण पाहू पॉन्झी स्किम्स कशा ओळखाव्या, त्यापासून कसे दूर राहावे. सर्वप्रथम, पॉन्झी स्किमकडे लक्ष देण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीकडे बघावे.

कुकर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 22/01/2019 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रेस्टिज चा नवा दिड लिटर कुकर विकत घेतला २-३ माणसा साठी खूप उपयुक्त झाकण बंद होण्यासाठी नवीन टेक्निक वापरले आहे झाकण बंद करण्या साठी खका मारावा लागत नाही वर जो नॉब आहे तो घड्याळ्याच्या दिशेने फ्रवला कि बंद होतो उघडताना उलट कृती भात भाजी चिकन वारं डाळ सारथी उपयुत टाकणे शिजवणे फोडणी सारे काम हा कुकर करतो स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनला आहे ..

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

लेखक खिलजि यांनी सोमवार, 21/01/2019 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल दे ना रे मजला मी कि नई छान छान खायला करून घालेन तुजला कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून लुटेल , हो फक्त लुटेल ते सूर्यनारायणाचे ऊन तू काया बनवलीस सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट तरी बी सारे शोधत बसलेत कुठं लागतोय का ते जॅकपॉट ? झाड बघा ना, कुठंच जात नाही तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं मलाही आवडेल तसं राहायला काहीही नको , हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला स्वतःच हात

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग २/३ (आकारमानाने पडणारे फरक)

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 21/01/2019 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणं, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणं, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणं आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणं - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!

तुझ्या कवितेची ओळ

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 21/01/2019 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते जिंदगीच्या निवडुंगा इवलेसे फूल येते तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते कालियाच्या डोहातून कृष्णधून उमटते तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते पाखराच्या लकेरीने हिर्वी वेल थर्थरते कवितेची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा ओठी येते पुन्हा पुन्हा रुजूनिया पुन्हा पुन्हा उगवते
काव्यरस

माझा मोबाईल डाएट

लेखक मित्रहो यांनी रविवार, 20/01/2019 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
“मी मोबाईल डायेट करनार आहे.” मी फार मोठा बॉम्ब वगैरे टाकतोय या थाटात बोललो. “हे काय नवीन फॅड?” माझा बॉम्ब हा एक फुसका फटाका आहे अशा तुच्छतेने तिने उत्तर दिले. “अग फॅड नाही. मी मोबाइल वापरनार नाही, मी व्हाटस ऍप वापरनार नाही, फेसबुक बघनार नाही, ट्वीट करनार नाही, युट्युब बघनार नाही म्हणजे माझ्याकडे किती रिकामा वेळ असेल, मी तो वेळ तुम्हा लोकांना देउ शकेल.

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ८

लेखक जुइ यांनी रविवार, 20/01/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ , भाग ६, भाग ७ वर्ल्ड वॉर टू मेमोरियल पाहून झाल्यावर आम्ही या पलीकडे असलेल्या प्रसिद्ध लिंकन मेमोरियलच्या दिशेने चालू लागलो.