Skip to main content

हा कुणाचा फोटो आहे ? ( स्पर्धेबाहेरची शशक १ )

लेखक खिलजि यांनी सोमवार, 04/02/2019 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का ? का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे ? " मी स्वतःशी म्हणालो. वृषा : " सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे " काहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय ? चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय. सिद्धेश्वर विलास पाटणकर

ग्रीन सिग्नल

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
एका वर्दळीच्या दिवशी संध्याकाळी ती तिच्या दुचाकीवरून घरी जाण्यास निघाली होती. संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती. पण हल्ली तिच्या लेखी ही वेळ म्हणजे संध्याकाळच! घरी जाऊन जेवण केल्यांनतर रात्र होते असं तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. दिनक्रम, कामाच्या वेळा तशा होत्या त्याला ती तरी काय करणार. इथलं हेवी ट्रॅफिकही आता अंगवळणी पडलं होतं. विचारात मग्न असलेली ती एक एक चौक मागे टाकत रस्ता कापत घरी जाण्याचे अंतर कमी करत होती. रस्त्यावरून वाहने चालवणार्या प्रत्येकाची घरी जाण्याची घाई पावलोपावली जाणवत होती. रोजचा परिचयाचा रस्ता असला तर आपण सराईतपणे गाडी चालवू शकतो.

[शशक' १९] - मारुतीला घाम फुटतो

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नित्यनेमाप्रमाणे उमाजीशेठ दर्शनाला देवळात घुसला. हनुमानाच्या मुर्तीकडे त्याने डोळे विस्फारुन पाहीले. मुर्तीचा चेहरा काळवंडलेला. गालावरुन थेंब ओघळत होते. ”मारुतराया, का घाम फुटला तुला? नको कोपू रे गावावर.” तो ढसढसा रडायला लागला. गावात वार्‍यासारखी बातमी पसरली. सगळे गावकरी देवळासमोर जमले. लोक कुजबुजू लागले. “अनाचार माजलाय.

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 04/02/2019 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. अशातच मिपावर ‘ प्युअरसोतम - ला – देस्पांद’ हा धागा वाचनात आला. त्यात पुलंच्या आपल्याला आवडलेल्या वाक्यांची नोंद वाचकांनी केलेली आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत.

[शशक' १९] - नियती

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ झाली तशी ती सरसरून उठली. एका अनामिक आनंदाच्या ओढीने आळस झटकून तीने आवरायला सुरूवात केली. एका नव्या आयुष्याची स्वप्ने गेल्या कित्येक रात्री तीने रंगवली होती. आज त्या स्वप्नांची पूर्तता करायची वेळ आली होती. एव्हाना तो यायला हवा होता.?!! मनाशीच तिला वाटलं, कदाचित त्याने आपला विचार तर बदलला नसेल ना? या विचाराने ती सैरभैर झाली. बरोबर आठ वाजता तो आला. सर्वांना चुकवत त्यांनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. त्या गर्दीत आपल्याला कुणी ओळखणारं नसेल असं वाटलं असावं त्यांना.

वेळेवर!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 04/02/2019 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
"बोला काय हवंय?" साधारण पन्नाशी उलटलेल्या काकांनी नितीनला अपादमस्तक न्याहाळत विचारलं. अं? नाव नोंदवायचं होतं लग्नासाठी! "अच्छा! मुलगा,मुलगी कोणासाठी? की दोघे?" जाडजूड वह्या वरखाली करत काकांनी विचारलं. नाही नाही!मी स्वत:च आहे लग्नाचा! "बरं बरं! या बसा!" एक जाडशी वही कम रजिस्टर काढून काकांनी विचारायला सुरुवात केली, हं सांगा, नाव? "नितीन आत्माराम कुलकर्णी" राहणार? पुण्यातच! बरं! नोकरी? गोरक्षनाथ पतसंस्था मौजे.... अंहं! त्याची गरज नाही.बरं वय काय?

[शशक' १९] - गळ

लेखक mayu4u यांनी रविवार, 03/02/2019 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून तो गळ टाकून बसलेला. दुपार होत आली तरी एकही मासा मिळाला नव्हता. उन्हासोबत वाढणाऱ्या भुकेने तो चिडचिडलेला… कंटाळून उठला, तर बाजूला काहीतरी चमकलं! बघितलं तर एका डब्यात सॅन्डविच होतं. "एखाद्या मासेमाऱ्याचं असेल..." पोटात आग पडलेली! इकडंतिकडं बघत त्यानं हळूच ते सॅन्डविच उचललं आणि घाईघाईत एक मोठा घास घेतला. दुसऱ्याच क्षणी कुणीतरी त्याची जीभ खेचतंय असं त्याला वाटू लागलं... ती अदृश्य शक्ती त्याला तलावाकडे ओढू लागली... प्राणभयाने तो किंचाळला, पण घशातून आवाज फुटेना! सुटकेसाठी तो खूप धडपडला, पण अखेरीस त्या शक्तीनं त्याला तलावात ओढून घेतलंच!

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १३

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 03/02/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १३ (Decorate Your Love) प्रजासत्ताक.. प्रेमाचा हक्क.. आज प्रजासत्ताक दिन.. म्हणजे प्रजेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा दिवस.. हक्क जे जन्म घेतल्यावर आपल्याला आपोआप मिळून जातात.. पण खरंच ते हक्क किती वापरता येतात..? हा प्रश्नच आहे.. ती बोलतच होती कारण त्याला तसेच होते.. तिच्या बहिणीचे तिच्या मनाविरुद्ध ठरत असलेले लग्न.. आज खुप वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र शाळेत भेटत होते.. सर्वजण आल्यावर तिच्या बहिणीच्या लग्नाचा विषय निघाला.. तिच्या बहिणीचेन लग्न ठरले होते..

[शशक' १९] - कदाचित

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 03/02/2019 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला आलेले दोन मित्र . कॉलेजमधल्या टिचींग , नॉनटिचींग स्टाफचे आवडते . एकमेकांचे रुमपार्टनर . आज उत्साहाने गप्पा मारत होते . करीअरची स्वप्ने रंगवत होते . एका मित्राने सुचवले . " मित्रा , मी ठरवलं आहे . यावर्षी प्रोजेक्टसाठी प्रिन्सीपॉल हजारशब्दे हेच आपले गाईड असणार . त्यांच्या ज्ञानाचा , अनुभवाचा आपल्याला चांगला उपयोग होईल . " रुमपार्टनर चपापुन सावधपणे म्हणाला . " जॉय दोस्ता , हजारशब्दे सर तापट आहेत . आयत्यावेळी तोंडघशी पाडतात . शहाणा असशील तर थोडा विचार कर . " " ठिक आहे यार .

[शशक' १९] - कोंडमारा

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 02/02/2019 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफीसहुन तो लवकरच परतला. प्रमोशनचा आनंद लपवता येत नव्हता. हळुच दार उघडलं... नको त्या अवस्थेत 'तो आणि ती' धक्काच बसला. शांतपणे बाहेर थांबला. चल, तु येतेय का ? की त्याच्याबरोबर येणार ? 'मला माफ कर प्लीज' हं, जाऊ देत. आज बाळाचा वाढदिवस. काय घेऊन येऊत त्याला आपण ? नाही, नको. 'काय गं तुझा वर्गमित्र ना तो, माझी तू ओळख करुन दिलेली आठवते. 'त्याच्या नौकरीसाठी आपण आर्थिक मदत केली, राहण्यासाठी घर नव्हतं, भाड्यासाठी पैसे दिले. अपघात झाला म्हणुन हॉस्पिटलचा खर्च. तोच ना तो. काहीतरी आठवत तो विचार करु लागला. झालं ते झालं. काही गोष्टी विसरलेल्याच बर्‍या. आणि तो बाहेर पडला.