Skip to main content

काॅफी पिऊन आले...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 28/06/2019 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.
काव्यरस

चिनी फसगत!

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 27/06/2019 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
चिनी फसगत ( खास करून प्रथमच भारतातून अति पूर्वेच्या देशात प्रवास करणाऱ्यांसाठी ) तो: चला आपण या वेळी मलेशिया सिंगापोरे ला जाऊन ती : अरे पण तिकडे जेवणाचा काय चित्र विचित्र चिनी मिळतं, आपण जरी नॉन वेग खात असलो तरी जमणार कसं? तो: आग त्यात काय आपण नाही का इथे चायनीज खातो जवळ जवळ आठवड्यातून एकदा खरं तर "ती " ची शंका रास्त असतें प "त्या" ला हे माहित नसता कि भारतात जो चिनी खातो ते " इंडियन चैनेईज" असत असत चविष्ट आणि मस्त पण ते काही खरे चिनी नव्हे , मेनलॅन्ड ( म्हणजे मूळ शांघाय वैगरे , सेनापती बापट रस्त्यावरचे नाही ) चीन तर सोडून द्या मलेशिया , इंडोनेशिया , सिंगापोरे मधील चैनेईज हे सुद्ध

खास मत्स्यप्रेमींसाठी एक शोध

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 27/06/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांना मत्स्यआहार खूप प्रिय होता हे बहुतेक लोकांना माहिती असेल त्यांच्या एका पुस्तकात ?( लेख किंवा छोट्या कथा ) त्यांनी "पावसाळ्यातील मत्स्यआहार " यावर एक लेख लिहिलेला आहे कोणत्या पुस्तकात? त्याचा शोध घेत आहे , कोणास माहिती असल्यास कृपया कळवावे हि विनंती

आहे चविष्ट तरीही ( आहे मनोहर तरीही ...)

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 27/06/2019 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच परदेशी प्रवास वर्णनात ( मिपा आणि इतर) जेव्हा प्रवासातील खाणे यावर लिहिले जाते तेव्हा जरा नाराजी चा सूर असतो, कधी असा उल्लेख असतो कि - "काय हे गारढोण खातात हि लोक" किंवा "काय बुवा मसालाच नव्हता !" केवळ एक खादाड आणि भटक्या म्हणून हे लिहीत आहे आणि हेतू फक्त हा कि नाण्याची दुसरी बाजू हि दाखवावी पहिले स्पष्टीकरण: यात माणसाने काय खावे किंवा खाऊ नये किंवा शाकाहारी किंवा मांसाहारी असावे यावर काही म्हणणे नाही जगात अन्न हे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते एवढेच ते आपल्याला आवडेलच असे नाही फक्त डोळस असावे जाणून घयावे आणि जमल्यास वेगळा प्रयत्न करावा तर हे झाले namanache घडाभर आता काही उदा

बालकथा -उन्नूचा मोरपिसारा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 26/06/2019 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
उन्नूचा मोरपिसारा ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जंगलात राहणारा उन्नू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा .कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं , तर कधी सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा उन्नू म्हणाला , "आई , काय हा माझा काळा रंग ! मी बदकांसारखा गोरा गोरा हवा होतो ." त्या वेळी तिथून एक परी चालली होती . तिनं ते ऐकलं . आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली . आई म्हणाली , "एक काम कर .

बिरादरीची माणसं - गोविंद काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी बुधवार, 26/06/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका".

व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 26/06/2019 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही. जेव्हा जेव्हा आपण नाईट शिप्ट करुन आल्यानंतर दिवसा झोपतो त्या वेळी घरातील व्यक्ती, लहान मुले, आजूबाजूच्या घरी राहणारे व्यक्ती, कुटूंब हे त्यांचे दिवसाचे दिनक्रम व्यतीत करत असतात. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला इतर सारे आवाज येत असतात. कुणी टिव्ही पाहत असतो, वाहने जात असतात, लहान मुले खेळत असतात इत्यादीमुळे आपली झोप विस्कळीत होत असते. अशावेळी हा व्हाईट नॉईज आपल्या कामी येतो.

भोपळ्याची भजी by Namrata's CookBook : ४

लेखक Namokar यांनी मंगळवार, 25/06/2019 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: भोपळा १ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ) २ चमचे तांदळाचे पीठ दीड चमचे लाल तिखट १/२ चमचा हळद १/२ चमचा ओवा १/२ चमचा जिरे / धने+जिरे पूड कोथिंबीर (optional) चवीनुसार मीठ १/४ चमचा सोडा तेल पाणी क्रमवार पाककृती: १.भोपळयाच्या साल काढून पातळ चकत्या करुन घ्या २. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा ,जिरे, लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर (optonal) एकत्र करुन घ्या . ३. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको) ४. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या ५. तळण्यासाठी तेल कढाई मध्ये गरम करायला ठेवा ६.