भोपळ्याची भजी by Namrata's CookBook : ४
लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भोपळा
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ
दीड चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा ओवा
१/२ चमचा जिरे / धने+जिरे पूड
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी
क्रमवार पाककृती:
१.भोपळयाच्या साल काढून पातळ चकत्या करुन घ्या
२. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा ,जिरे, लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर (optonal) एकत्र करुन घ्या .
३. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
४. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
५. तळण्यासाठी तेल कढाई मध्ये गरम करायला ठेवा
६. भोपळ्याची एक एक चकती मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या
मस्त गरम गरम संपवून टाका


याद्या
7129
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
(No subject)
अशी भजी
हो व्हिडीओ टाकला आहे . नक्की
In reply to अशी भजी by श्वेता२४
नम्रता,
In reply to हो व्हिडीओ टाकला आहे . नक्की by Namokar
बदल करेन नक्की .धन्यवाद :)
In reply to नम्रता, by priya_d
नम्रता,
In reply to हो व्हिडीओ टाकला आहे . नक्की by Namokar
फोटो कसे टाकावेत
फोटो कसे टाकावेत.
कंजुसजी यांचा पुढील धागा देखील उपयुक्त आहे.
धन्यवाद ...वाचते ...
In reply to कंजुसजी यांचा पुढील धागा देखील उपयुक्त आहे. by श्वेता२४