Skip to main content

डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल

लेखक nishapari यांनी मंगळवार, 09/07/2019 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुपरनॅचरल मध्ये डेमन कसा निर्माण होतो ही कल्पना उत्तम दाखवली आहे .... जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं . ज्याला शरीर नसतं फक्त काळ्या धुराच्या स्वरूपात त्याचं अस्तित्व असतं . डेमनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया फार वेदनादायी असते पण एकदा डेमन झाल्यावर काही शक्ती प्राप्त होतात , अमानवी शक्ती , माणसाच्या शरीरात शिरून ते वापरणं , स्पर्श न करता वस्तू इकडच्या तिकडे करणं आणि आणखी बऱ्याच .... डेमन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ...

सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 09/07/2019 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात तुम्ही हसा प्रसन्नतेने ,मग बघा आजूबाजूला कश्या चीता पेटतात तुमच्या हसण्याची किंमत , तुम्हालाच ठाऊक नाही तुम्हाला हसताना बघून, त्यांचं स्वतःच कामच होत नाही त्यांचं खिन्नपण जणू तुमच्याशीच निगडित असतं वाया घालवत असतात वेळ , हळूहळू प्रारब्ध बदलत असतं रोवूनीया झेंडे कैक , कैफ मिरविती एकमुखाने एक हास्याची लकेर मात्र , सारं काही उधळत असतं कोण कुणाच्या मनी वसला , तरीहि गवसत नाही कुणाला फक्त एका हर्ष होता , सारे बैसती पुसत दुःखाला षड्रिपूंच्या विळख्यात सारे ऎसेकाही गुरफटलेले बघा इथे ओ पूर आला , जो तो संगे वाहत गेला विचारले मी त्याला , हसण्याचे कारण

पातोळ्या

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी मंगळवार, 09/07/2019 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी इथलीच. पूर्वीची गौरीबाई गोवेकर. किती काळ लोटला ईथं येऊन पण काळाच्या ओघात जुन्या खात्या संबंधीत माहितीचं इतकं विस्मरण झालं की ते खातं पुन्हा सुरू करता आलं नाही. म्हणून या दुसऱ्या खात्याची तजवीज केली. खानसहेबांची खिचडी, पाया सूप वगैरे माझ्या पाककृती असतील तुमच्या लक्षात. आतासुद्धा क्षितिजच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. असो. आज बर्याच काळानंतर पुन्हा इथं आले शुभारंभ गोडापासून करते. तर आज पाहूया पातोळ्या. आमच्या गोव्याकडचा खास पदार्थ साहित्य: दोन वाट्या तांदळाची बारीक दळलेली पिठी (वासाचो तांदुळ असलो तर छानच.

पासवर्ड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 09/07/2019 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता... त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता... चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति.. हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते.. * चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति... मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता... * अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला.. ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला.. त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली... "का काळजी करतोस?

उत्तरार्ध

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 09/07/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा - किरण व संगीता --एक आंतर जातीय प्रेम कहाणी ) किरण राहत असलेला फ्ल्याट त्याची कन्या अनुच्या नावावर होता गाडी बंगला नोकर चाकर सत्ता सामर्थ्य सारे असलेल्या देवयानीला (सांगिताला) तिकडे राहणे मंजूर नव्हते नवविवाहित वधूचा अधिकार गाजवत तिने किरणला त्याचे चंबूगबाळे उचलून तिच्या बंगल्यावर राहायला यायचा आदेश दिला आता बाकी काहीच काम नसल्याने दोघांचा बराचसा वेळ बंगल्यातल्या भल्यामोठ्या बेडरूम मधे जात होता त्यामुळे संसाराच्या नव्यानवलाईत (आणि सांगिताला) दिवस पटापट गेले. एका प्रसन्न सकाळी किरणच्या छातीवर डोके टेकत लाडेलाडे ती म्हणाली (कवळी काढल्

पुस्तक परिचय : सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )

लेखक मालविका यांनी मंगळवार, 09/07/2019 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह ) काही दिवसांपूर्वी मैत्रीण अस्मिता चितळे हिच्या कपाटात पुस्तक दिसलं. पुस्तक हातात घेतल कि मी पाठच पान बघते. साधारण पुस्तकाचा आशय लक्षात येतो. या पुस्तकावरही पाठच्या पानावर थोडक्यात ओळख दिलेली आहे."आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वतः सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली हि स्मरणयात्रा", असंच पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. पु लं हे आधीच जिव्हाळयाचा विषय आणि त्यांची बायको म्हणून कदाचित सुनीताबाई सुद्धा. लगेचच अस्मिता कडून पुस्तक उधारीवर घेतलं. तरीही घरी येऊन महिनाभर पुस्तक नुसतं पडून होत.

प्रियाच्या शरीरात शीरलेली दुर्गा गोगटे एक भयकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 09/07/2019 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
वासुदेव सोमण कोकणातून दहा वर्षा पूर्वीच पुण्याला स्थायिक झाले होते सोमणांचा मुख्य व्यवसाय भिक्षुकी लग्न -नामकरण मुंज आदी कार्ये ते करत असत अल्पसंतोषी स्वभाव होता यजमानांना व्यवस्थित सेवा देवे प्रसंगाचे पावित्र्य सांभाळणे हि त्यांची खासियत होती यजमान पण त्यांच्या ह्या वागण्यावर खुश असायचे ठरलेल्या बिदागी शिवाय त्यांना आणखीन पैसे पण मिळत असत पुण्यात वन रूम किचन चा ब्लॉक होता एक राजकारणी यजमान होते त्यांच्या कृपे मुळे त्यांना हा ब्लॉक सरकारी कोट्यातून अल्प दरात मिळाला होता * भार्या सुनंदा गृहिणी होती प्रिया नावाची एक गोड चेहे-याची मुलगी होती ती कॉलेज च्या दुस-या वर्षाला होती सौंदर्य

प्रेम कोडगे घेऊन फिरलो

लेखक खिलजि यांनी सोमवार, 08/07/2019 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा तेच अगम्य कोडे प्रेम कोडगे घेऊन फिरलो कुठे कुठे शोधले तुला सखे ? वैतागून हळूच पिवळा झालो तू नाही भेटली तरीही शोधली तुला अर्धांगिनीत भेट अधुरीच राहिली आपुली , शोधून पुरता अर्धा झालो अर्थ अनर्थ घेऊनि सारे गहिवर आला स्वप्नाचा माळ फुलांची सुकून गेली तरीही सुवास दरवळे प्रेमाचा {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय

लेखक खिलजि यांनी सोमवार, 08/07/2019 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी आपण जिथे भेटायचो तिथे आता एक टपरी झालीय एक तपानंतर पुन्हा कप घेतला हाति पण कटिंग इथली जर्रा बरी झालीय वळणे घेत घेत तू तिथून , तर मी कुठून कुठून यायचो कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो मी घाबरून तुलाच म्हणायचो , हळहळू तुझि डेरिंग बरी झालीय त्या झाडामागे बराच इतिहास घडला तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा पण नंतर तुटलो ते कायमचेच , जणू भेटलोच नव्हतो आज इथे आलो तेव्हा " साठी " माझी पुरी झालीय असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय {{ सिद्धेश्वर विलास

१००.४ FM (full to majja)

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 08/07/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या राईड चे वर्णन लिहायची कामगिरी माझ्या तरुण मित्र मंडळीनी माझ्यावर सोपवली म्हणून हा लेखन प्रपंच. आमचे तरुण साथिदार आता सायकल सह लेखणी ही जोरदार चालवतात अगदी आजच्या पावसासारखी धुंवाधार. तर मंडळी काल रात्री उशीरा गृप वर संदेश सोडला ,उद्या खेड दापोली कोळथरे दापोली खेड राईड ला निघतोय.