मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम कोडगे घेऊन फिरलो

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पुन्हा तेच अगम्य कोडे प्रेम कोडगे घेऊन फिरलो कुठे कुठे शोधले तुला सखे ? वैतागून हळूच पिवळा झालो तू नाही भेटली तरीही शोधली तुला अर्धांगिनीत भेट अधुरीच राहिली आपुली , शोधून पुरता अर्धा झालो अर्थ अनर्थ घेऊनि सारे गहिवर आला स्वप्नाचा माळ फुलांची सुकून गेली तरीही सुवास दरवळे प्रेमाचा {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

वाचने 2261 वाचनखूण प्रतिक्रिया 3

जालिम लोशन 09/07/2019 - 21:08
हिंदीत सठिया गया म्हण आहे. म्हणजे साठी उलटलेला. पिकल्या पानाचा हिरवा देठ.

In reply to by जालिम लोशन

नाखु 11/07/2019 - 06:39
तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आहे ते साठी उलटून बाराच्या भावात गेलेले आहेत. त्यांच्याच एका धाग्यावर प्रतिसाद दिला आहे त्यांनी फक्त ७३ म्हणून!! स्मरणशील वाचकांची पत्रेवाला नाखु

खिलजि 10/07/2019 - 15:01
धन्यवाद साहेब ,, पण एक बदल ,, अजूनही कोवळा आहे हा : खिलजी आणि ...